Latest Crime News | कळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State excise department team seized goods

Nashik Crime News : कळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

कळवण (जि. नाशिक) : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या हद्दीतील अक्राळे फाटा, इंडियन ऑईलचे पंपासमोर, बनारवाडी शिवार, ता. दिंडोरी येथे सापळा रचून आयशर कंपनीचे मालवाहतुक करणारे वाहन क्र. एम.एच.४८ ए. वाय. ३६६३ पकडून २० लाख ७० हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Illegal liquor stock worth Rs 21 lakh seized from Kalwan State Excise Department action Nashik Latest Crime News)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभाग कळवण यांना मिळालेल्या माहिती नुसार एक आयशर कम्पनीचे वाहन नाशिक दिंडोरी रोडवरून जाणार होते. त्यांनी सापळा रचून अक्राळे फाटा, इंडियन ऑईलचे पंपासमोर, बनारवाडी शिवार, ता. दिंडोरी येथे वाहन पकडले या संशयित वाहनाची तपासणी केली असता सदर वाहन पुर्णतः रिकामे दिसुन आले. परंतु सदर वाहनाच्या केबिनच्या मागच्या बाजुस व वाहनाच्या खालच्या बाजूस संशय येणार नाही अशा ठिकाणी एक विशिष्ट पध्दतीचा कप्पा बनविण्यात आला होता.

सदर कप्यामध्ये गोवा राज्यातील (महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला) मद्यसाठा वाहतुक करतांना आढळून आले. यात परराज्यातील विदेशी मद्य १३६९.२० ब.लि. (एकुण १५३ बॉक्स) गोवा राज्यात विक्रीकरीता विविध ब्रॅन्डच्या विदेशी मद्याचे १४३ बॉक्स, किंगफिशर स्ट्रॉम बिअर मद्याचे १० बॉक्स व सहा चाकी आयशर कंपनीचे एम.एच.४८ ए. बाय ३६६३ वाहन असा रु.२० लाख ७०,हजार ७२०/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

हंसराजभाई मोहनभाई ठाकुर रा.बलमान तिनरस्ता, खोडीयार माता जप्त मुददेमालाची किंमत आरोपींची नावे मंदिराजवळ, चलथान साखर कारखान्यासमोर, ता. पलसाना, जि. सुरज (गुजरात राज्य तसेच फरार आरोपीत इसमामध्ये वाहनमालक, महद्यसाठा पुरवठादार, हि कारवाई विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग,अर्जुन ओहोळ, तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक श वि गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली एस. के. सहस्रबुध्दे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दुय्यम निरीक्षक एम.बी. सोनार व आर. एम. समरे जवान सर्वश्री डी. एन. आव्हाड, एम. जी. सातपुते, व्ही. टी. कुवर व वाहनचालक श्री.पी.एम.माईकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदर कारवाईसाठी व्ही. एस. कौसडीकर, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अ विभाग, जि. नाशिक यांनी तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सीमा तपासणी नाका, करजाळी तथा भरारी पथक क्र.३. दिंडोरी जि. नाशिक यांचे विभागातील अधिकारी / कर्मचारी यांनी मदत केली.

एस. के. सहस्रबुध्दे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कळवण -- कळवण, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यात अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास अथवा माहिती कळल्यास विभागाच्या या टोल फ्री क्रमांक १८००२३९९९९. व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ तसेच दूरुवनी क्रमांक ०२५३/२३१९७४४ वर संपर्क साधावा.