एसआयटी चौकशी करा!

एसआयटी चौकशी करा!
Published on: 
अवैध रेती उत्खननाची एसआयटी चौकशी करा! -- माजी सैनिक सोनू फौजी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीपात्रात झालेल्या कथित अवैध रेती उत्खननाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोकुळ पाटील (सोनू फौजी) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. - शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे, दराणे, रोहाणे, अमराळे, अरावे, शेवाडे, आलाणे, चिरणे व कदाणे आदी गावांजवळील बुराई नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान झाले आहे. नदीपात्राचे ड्रोन सर्वेक्षण करून खड्ड्यांची लांबी, रुंदी व खोली मोजावी, उत्खनन झालेल्या रेतीचे प्रमाण निश्चित करून महसूल नुकसानाचे अधिकृत मूल्यांकन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अवैध उत्खनन रोखण्यासाठी केलेल्या कारवाईची तपासणी करून संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल आणि पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी. संगनमताचा संशय आढळल्यास डिजिटल पुराव्यांची तपासणी करून दोषींवर शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात नमूद आहे. तक्रारीवर १० दिवसांत प्राथमिक चौकशी सुरू करून एसआयटी नियुक्तीबाबत घेतलेल्या निर्णयाची लेखी माहिती व चौकशी अहवाल तक्रारदाराला द्यावा, अशी मागणी सोनू फौजी यांनी केली आहे. मुदतीत ठोस कारवाई न झाल्यास मुंबई मंत्रालयात शांततामय लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com