Crime
sakal
अंबासन: वनसंपदेचे रक्षण आणि अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वन विभागाने पुन्हा एकदा कारवाई करत सटाणा व मालेगाव परिसरात सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकच्या दक्षता पथकाने केलेल्या या दोन स्वतंत्र कारवाया जिल्ह्यातील बेकायदा लाकूड तस्करीचे गंभीर चित्र पुन्हा स्पष्ट करतात.