doctors
sakal
नाशिक: राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने ५ सप्टेंबरला काढलेले परिपत्रक मागील परिपत्रकांच्या विरोधात असल्याची तक्रार इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने केली आहे. यानुसार, होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये स्वतंत्र नोंदणी बेकायदेशीर ठरेल, असे असे नमूद करत इंडियन मेडिकल असोसिएशनने या निर्णयाविरोधात गुरुवारी (ता.१८) एकदिवसीय संप पुकारला आहे. शासनाने निर्णय मागे न घेतल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.