नाशिक: जिल्ह्यात एम-सॅण्ड धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. खासगी जमिनी व यापूर्वी सुरू असलेल्या खाणपट्ट्याच्या ठिकाणी एम-सॅण्ड युनिट कार्यान्वित केली जाईल. इच्छुक व्यक्ती व संस्थांनी शासनाच्या महाखनिज प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे.