नाशिक- भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद केल्यानंतर अफगाणिस्तानवरुन येणारा सुकामेवा देशात येणे बंद झाले आहे. परिणामी, सुकामेवा भविष्यात महाग होऊ शकतो. तर बांगलादेशने कांदा, संत्री आयातीवर जानेवारीपासूनच शुल्क लागू केले आहे. त्यामुळे या वस्तूंच्या देशांतर्गत किमती वाढण्याची शक्यता निर्यातदारांनी वर्तविली आहे.