नाशिक : राज्यात धर्मांतर परवानगीमुळे कुणालवर कारवाई अशक्य

महाराष्ट्रात धर्मांतराला प्रतिबंध नाही, एटीएसने पकडलेल्या कुणालवरही कारवाई अशक्य
conversion
conversionesakal

नाशिक : धर्मांतरण आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांची अनधिकृतपणे उलाढाल केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी (ATS) पथकाने कुणालला नुकतीच अटक केली. उत्तरप्रदेश पोलिसांच्या कोठडीत सध्या त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. मात्र, उत्तर प्रदेश दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या कारवाई ज्या भागात झाली त्याच भागात तोफखाना, नोट प्रेस व इतर संवेदनशील ठिकाणाच्या जवळपास राहणाऱ्या कुणालच्या अटकेमुळे नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) इंटीलिजन्सवर प्रश्न निर्माण केले गेले.

धर्मांतरण आणि कोट्यवधी रुपयांची अनधिकृतपणे उलाढाल

यावर मात्र, या सगळ्या बाबी निरर्थक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचवेळी कुणालने नाशिकमध्ये प्रॅक्टीस केली. तो डॉक्टर नसताना त्याने प्रॅक्टीस केली या आरोपात त्याच्याविरोधात शहर पोलिसांकडून कारवाई होऊ शकते. मात्र, त्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशनने तक्रार द्यायला हवी. शहर पोलिसांसाठी एवढाच मुद्दा महत्त्वाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेश एटीएसने पकडलेला कुणाल चौधरी ऊर्फ अतीक याच्याविरोधात अवैध पद्धतीने डॉक्टर म्हणून काम केल्याची तक्रार आली तरच नाशिक पोलिसांकडून त्याच्यावर कारवाई होऊ शकते. उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात धर्मांतराला प्रतिबंध नसल्याने त्याच्यावर उत्तर प्रदेशाच्या धर्थीवर कारवाईची शक्यता नाही.

conversion
मी 'भाई' युनिव्हर्सिटीमध्ये गेलो नाही; छगन भुजबळ कडाडले

कुणालविरोधात गंभीर गुन्हे नाहीत

धर्मांतरण महाराष्ट्रात गुन्हा ठरत नाही. त्याच्याविरोधात यापूर्वी कोणत्याही गंभीर गुन्ह्याची नोंद नाही. कोणत्याही व्यक्तीची माहिती संकलीत करणे, त्याच्या नोंदी ठेवणे असेच होत नाही. त्यासाठी कायद्याचा आधार लागतो. धर्मांतरणाबाबत उत्तर प्रदेशासह काही राज्यात कायदा आहे. त्या कायद्यानुसार त्यांनी कारवाई केली. एटीएसने नाशिक पोलिसांशी कोणताही संपर्क केलेला नाही. त्यामुळे नाशिकला संशयिताविरोधात धर्मांतरण कायद्यानुसार कारवाईचा प्रश्नच नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

conversion
नुकसानभरपाईत कुणावरही होणार नाही अन्याय - भुजबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com