Latest Marathi News | गुजरातला Foxconn अन महाराष्ट्राला Popcorn | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal criticized the government at the Shirdi activist camp

Chhagan Bhujbal Taunting Statement : गुजरातला Foxconn अन महाराष्ट्राला Popcorn

नाशिक : गुजरातला ‘फॉक्सकॉन' अन महाराष्ट्राला ‘पॉपकॉर्न'अशा शब्दांमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शिर्डीतील ‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा‘ या कार्यकर्ता शिबिरात आज ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, की वेदांता-फॉक्सकॉनसारखा मोठा प्रकल्प गुजरातला पळवला. तेव्हा यापेक्षा मोठा प्रकल्प आणू असे म्हणणाऱ्यांनी अजून एकही प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. या उलट फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आधीचा १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आणि टाटा एअर बसचा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला ‘दिवाळी गिफ्ट' म्हणून देण्यात आला.(In activity camp of Nationalist churning for Future Chhagan Bhujbal statement pulls to government About topic of Foxconn Project Nashik Political News)

हेही वाचा: MSRTC Income : एसटीची रोज कोटींची दिवाळी!

महाराष्ट्रातले रोजगार, तुमच्या हक्काचे रोजगार गुजरातला पळविले जात आहेत. मी स्वतः त्यासाठी रतन टाटा यांना पत्र लिहिले होते. तुम्हाला सर्व सुविधा देऊ महाराष्ट्रात आणि या नाशिकमध्ये प्रकल्प घेऊन या, एचएलएलच्या सोबत एअरबसचे उत्पादन करा, त्यासाठी तुम्हाला सर्वोतपरी सहकार्य केले जाईल. मात्र तो प्रकल्प गुजरातला गेला. विमान दुरुस्त करणारा ‘सॅफ्रन’ चा प्रकल्प हैदराबादला गेला. आमचे दोन अडीच लाख कोटींचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला केवळ २ हजार कोटीचा प्रोजेक्ट दिला.

मनुप्रवृत्तीचा निषेध करावा

फुले, शाहु, आंबेडकरांच्या राज्यात धार्मिक द्वेषाचे राजकारण काही मंडळी करू पाहत आहेत. पण ते विसरतात की, धर्मांध सत्तेच्या विरोधात उभे राहण्याची ताकद फुले-शाहु-आंबेडकर आम्हाला देतात. धर्मांध पक्षाशी लढा हा विकासाच्या मुद्दावरून करावा लागेल. आपण विकासाचे राजकारण करतो, पण देशात सध्या काय चालू आहे याचा विचार करत आगामी काळातील निवडणुकांच्यादृष्टीने आपल्याला तयार राहावे लागेल, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की कपाळावर टिकली असेल तर प्रश्न विचार, असे वक्तव्य मनोहर भिडे यांनी केले. केवळ चक्र उलटे फिरविण्यासाठी, मनुवादाला पुन्हा चालना देण्यासाठी हा प्रयत्न होत आहे. ज्या सावित्रीबाई यांच्या कपाळावर भले मोठे कुंकू असताना महिलांच्या शिक्षणासाठी काम करताना त्यांना दगड, धोंडे, शेण फेकून मारले. त्यामुळे अशा मनुवृतीच्या लोकांचा आपण निषेध केला पाहिजे.

हेही वाचा: Life Certificate in India Post : आता टपाल कार्यालयातूनही मिळणार 'जीवन प्रमाणपत्र'

महागाई, बेरोजगारी या प्रश्‍नांचा वाचा श्री. भुजबळ यांनी फोडली. ते म्हणाले, की सत्य परिस्थितीवर बोलल्यास भाजपच्या यंत्रणा कामाला लागतात आणि मग घरी केंद्र सरकारच्या यंत्रणा येऊन पोहचतात. पण राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आलेल्या कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभा राहतो. इडीने कारवाई केल्यानंतर जामीन लवकर मिळत नाही.

मालमत्तेवरील जप्ती लवकर मुक्त होत नाही आणि वर्षानुवर्षे केस बंद होत नाही. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या कारवाया भाजप सोडून इतर पक्षातील नेत्यांवर होत आहेत. या केंद्रीय यंत्रणेमुळे अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांना शरद पवार हे कधीही एकटे सोडत नाहीत. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या पाठीशी कायम शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला आहे.

हेही वाचा: Importance of Chaar Dhaam Yatra : चार धाम यात्रेने परम सुखाची प्राप्ती : स्वामी संविदानंद