Latest Marathi News | पनगरला वृक्षतोड प्रकरणी 14 लाख 85 हजाराचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fine Collected by Municipal Corporation again cut Tree

Nashik : उपनगरला वृक्षतोड प्रकरणी 14 लाख 85 हजाराचा दंड

नाशिक रोड : उपनगर येथे एका खासगी बंगल्यात बेसुमार वृक्षतोड केल्याप्रकरणी बंगला मालकास १३ लाख ८५ हजार रुपये दंड आकारला आहे. वृक्षप्रेमी वैभव देशमुख यांच्यामुळे या बंगल्यातील अनेक झाडे वाचली आहेत.

आठ दिवसांपूर्वी उपनगरला बेसुमार वृक्षतोड चालू होती. परिसरातील वृक्षप्रेमींनी ही बाब वृक्षमित्र वैभव देशमुख यांना सांगितली.

वैभव देशमुख यांनी महापालिकेला यासंबंधी तत्काळ माहिती देऊन संबंधित बंगला परिसरात पथक पाठवले. या पथकाने सर्व केल्यानंतर तीस झाडे तोडलेली दिसली. अनेक झाडे ३०-४० वर्षे जुनी आहेत. (In case of tree felling in suburbs Collect 14 lakh 85 thousand fine by Municipal Corporation Nashik News)

हेही वाचा: Nashik : झोपड्यांचे अतिक्रमण; पर्यटकांना होते ओंगळवाणे प्रदर्शन; Smart Roadचे विद्रूपीकरण

मोठ्या झाडांची संख्या १४ हून अधिक आहे. महापालिकेने १३ लाख ८५ हजाराचा दंडाची नोटीस बंगला मालकाला पाठवली आहे.

इतर झाडे वाचल्याचा आनंद परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहे. या संदर्भात उपायुक्त विजयकुमार मुंडे, उद्यान निरीक्षक संजय ओहोळ आणि संतोष पाटील यांनी या संदर्भात कारवाई केली.

"दंड भरल्याशिवाय या बंगल्याच्या आवारात एकही पक्के बांधकाम होणार नाही. अनेक वेळा महापालिकेने नागरिकांना झाडे तोडली म्हणून दंड ठोठावला आहे, मात्र त्यांनी अजूनही नागरिकांनी दंड भरला नाही. सर्व गोष्टींवर वृक्षप्रेमी संघटनेचा वॉच आहे."

- वैभव देशमुख वृक्ष मित्र व तक्रारदार

हेही वाचा: Nashik News : ZP ला संगणक खरेदीत 12 लाखांचा फटका?