Latest Marathi News | सिडकोत नायलॉन मांजविक्री; तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik News : सिडकोत नायलॉन मांजविक्री; तिघांना अटक

नाशिक : संक्रांत जवळ येत असल्याने सध्या नायलॉन मांजाचा साठा करण्यास सुरवात झाली आहे. चोरीछुप्या पद्धतीने व्यापारी मांजा विकत असून, बंदी घालण्यात आलेल्या नायलॉन मांजावर नजर ठेवून अंबड पोलिसांनी शनिवारी (ता. २४) कारवाई करत सुमारे एक लाख चार हजार आठशे रुपयांचा नायलॉन मांजाचा साठा जप्त केला आहे.

यात तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्रिमूर्ती चौक येथील सम्राट पतंग विक्री केंद्रावरून नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik Sports News : महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या प्रचिती भवरची निवड

वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई प्रशांत नागरे, मुकेश गांगुर्डे, योगेश शिरसाठ, प्रवीण राठोड, तुषार देसले, दीपक जगताप यांनी सापळा रचून मांजा जप्त केला.

संशयित अजिंक्य प्रदीप भिसे (रा. त्रिमूर्ती चौक) व बाळासाहेब खंडेराव राहीन्ज (रा. जेल रोड) यांना अटक केली आहे.

रात्री साडेदहाला सिडकोतील गणेश चौकात असलेल्या एमएसईबी ऑफिसच्या जवळ समाधान राजेंद्र मोरसकर (वय १९, रा. परदेशी यांच्या भाडोत्री घरात, एमएसईबी ऑफिसच्या मागे, सिडको) हा देखील नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. छापा टाकून कारवाई करून त्याला ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा: Nashik News : शहरात 2 महिलांच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल