नाशिक शहरात अवघे ५ टक्के लसीकरण पूर्ण

Corona Vaccination
Corona Vaccinationfile photo

नाशिक : साडेचार महिन्यात शहरात अठरा ते ४४ वयोगटातील सहा हजार ४३२ नागरिकांना पहिला डोस मिळाला, तर ४५ वयोगट व फ्रंटलाइन वर्करमध्ये समावेश असलेल्या दोन लाख ७७ हजार ७५० नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. एकूण लोकसंख्येचा विचार करता अवघे पाच लसीकरण (Corona Vaccination) शहरात पूर्ण झाले. शंभर टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी लस उपलब्धतेचा विचार केल्यास वर्ष ते दीड वर्षे लागेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. (in nashik city only five per cent of the total population was corona vaccinated)


केंद्र सरकारच्या सूचनेनुसार १६ जानेवारीपासून शहरात लसीकरण मोहीम सुरु झाली. प्रारंभी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, पोलिस, होमगार्ड या अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना प्राधान्य देण्यात आले होते. सुरवातीच्या काळात लसीचा पुरवठा सुरळीत असल्याने अडचण नव्हती. त्यात १ मेपासून अठरा ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाची घोषणा करण्यात आली. परंतु, याच दरम्यान मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा भासू लागला. लसीकरणाची घोषणा झाली, परंतु लस उपलब्ध न झाल्याने अडचण निर्माण झाली. लसीकरण केंद्रांवरून नागरिक परतू लागले, तर जेथे लस उपलब्ध होती त्या केंद्रांवर दिवसभर रांगा लावूनही लस मिळाली नाही. दुसरीकडे ज्यांनी पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेण्याची तयारी दर्शविली, त्यांना देखील ताटकळत उभे राहावे लागले. साडेचार महिन्यात ३ लाख ४९ हजार ७२० डोस शहरासाठी प्राप्त झाले. त्यात कोव्हिशील्डचे दोन लाख ९२ हजार ९२० तर कोव्हॅक्सिनचे (Covaxin) ५६ हजार ८०० डोसचा समावेश आहे. बॅरलमधील लसीची मात्रा अधिक असल्याने तेरा हजार ४७१ अतिरिक्त डोस देण्यात आले. त्यात दोन लाख ७७ हजार ७५० नागरिकांना पहिला डोस, तर ८५ हजार ४४१ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगटातील ६, ४३२ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला, तर सत्तर नागरिकांना दुसरा डोस मिळाला.

Corona Vaccination
जितेंद्र भावे यांचे अर्धनग्न आंदोलन : महापालिका करणार चौकशी


असे देण्यात आले डोस

लाभार्थी पहिला डोस दुसरा डोस
आरोग्यसेवक ३५,१९२ १२,८७७
फ्रंटलाइन वर्कर १७,०७५ ६,९०१
४५ ते ६० वयोगट १,१८,५२३ २९,०२३
६० वर्षांपुढील १,००,५२८ ३६,५७०
१८ ते ४४ वयोगट ६,४३२ ७०
--------------------------------------------------------------
एकूण डोस २,७७,७५० ८५,४४१
--------------------------------------------------------------

(in nashik city only five per cent of the total population was corona vaccinated)

Corona Vaccination
जितेंद्र भावे यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com