esakal | धक्कादायक! ग्रामीण भागातील ३० मृतांसह नाशिकमध्ये कोरोनाचे ४२ बळी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन हजार ८२५ बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. शनिवारी झालेल्‍या ४१ मृत्‍यूंमध्ये सर्वाधिक ३० मृत्‍यू नाशिक ग्रामीण भागातील आहेत.

धक्कादायक! ग्रामीण भागातील ३० मृतांसह नाशिकमध्ये कोरोनाचे ४२ बळी

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. परंतु कोरोनामुळे (Corona)होणाऱ्या मृत्‍यूंची संख्या आरोग्‍य यंत्रणेपुढे आव्‍हान निर्माण करणारी आहे. शनिवारी (ता. ८) नाशिक ग्रामीण भागातील ३० मृतांसह जिल्ह्यात एकूण ४२ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. ग्रामीणमध्ये निफाडमधील आठ, तर येवला तालुक्‍यातील पाच मृतांचा समावेश आहे. (In Nashik district 42 people have died due to corona)

जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन हजार ८२५ बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. शनिवारी झालेल्‍या ४१ मृत्‍यूंमध्ये सर्वाधिक ३० मृत्‍यू नाशिक ग्रामीण भागातील आहेत. या परिसरात निफाड तालुक्‍यातील आठ, येवला तालुक्‍यातील पाच मृतांसह सिन्नर आणि दिंडोरी तालुक्‍यांत प्रत्‍येकी चार, नांदगाव तालुक्‍यात तीन, चांदवड आणि इगतपुरी तालुक्‍यांत प्रत्‍येकी दोन, नाशिक ग्रामीण व बागलाण तालुक्‍यांतील प्रत्‍येकी एका बाधिताचा बळी घेतला. नाशिक महापालिका क्षेत्रात दहा, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील डोंगराळ भागात भुकंपाचे धक्के; नागरिकांत भीती

सायंकाळी उशिरापर्यंत जिल्ह्यातील पाच हजार ३७० रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यापैकी सर्वाधिक तीन हजार ३९३ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक शहरातील एक हजार ५७७, मालेगावच्‍या चारशे रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात तीन हजार १५९ रुग्‍ण दाखल झाले आहेत. यापैकी दोन हजार ८६४ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात नऊ, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १३ रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये २२८, मालेगावला ४५ रुग्‍ण दाखल झाले आहेत.

ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत एक हजार ३१५ ने घट

दोन दिवसांपासून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या वाढत होती. परंतु शनिवारी कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या अधिक राहिल्‍याने ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या घटली. दिवसभरात दोन हजार ७९५ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. यात नाशिक शहरातील एक हजार ४२९, नाशिक ग्रामीणमधील एक हजार २९८, मालेगावमधील सतरा, तर जिल्‍हाबाहेरील ५१ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात चार हजार ६९ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. यात नाशिक शहरातील दोन हजार ४५६, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ४९८, मालेगाव क्षेत्रातील ५५, तर जिल्‍हाबाहेरील साठ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत एक हजार ३१५ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात ३३ हजार २३८ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

(In Nashik district 42 people have died due to corona)

loading image
go to top