कोरोना संकटात पिंपळगावला कुटुंबांना एलआयसीचा आर्थिक आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIC

कोरोना संकटात पिंपळगावला कुटुंबांना एलआयसीचा आर्थिक आधार

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ या घोषवाक्याने विम्याचे महत्त्व पटवून देणारी भारतीय आयुर्विमा कंपनी (LIC) गेल्या वर्षात कोरोनामुळे (Coronavirus) कर्ता पुरुष हरपलेल्या कुटुंबांना भक्कम आर्थिक आधार देणारी ठरली आहे. पिंपळगावच्या एलआयसी कार्यालयाने तब्बल ४८ कोटी ५१ लाख रुपये ग्राहकांना दिले आहेत. त्यातील सहा कोटी २२ लाख रुपये अकस्मात मृत्यूनंतर वारसांना देण्यात आले आहेत. (In Pimpalgaon LIC paid more than 48 crore to customers during the Corona period)

नऊ हजार ७१ ग्राहकांना ४८ कोटी ५१ लाख रुपये

एखाद्या गोष्टीचे महत्त्व प्रसंग ओढावल्यानंतर समजते. आयुष्य किती अनिश्चित अन् बेभरवशाचे आहे, हे सध्याच्या संकटकाळात अधिक स्पष्ट जाणवत आहे. वर्षभरात कोरोनाने अनेकांचा मृत्यू झाला. व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूनंतर ती पोकळी भरून निघत नाही. पण एलआयसी विमा काढलेल्या त्या सुजाण नागरिकांनी कुटुंबाला आर्थिक विवंचनेतून सोडविले आहे. वर्षभरात विमा उतरविलेल्या ३५९ व्यक्तींचा कोरोना व आजारपणाने मृत्यू झाला. त्या कुटुंबांना एकूण सहा कोटी २२ लाख २० हजारांच्या रकमेचा परतावा एलआयसीने तत्काळ दिला. विशेष म्हणजे काही व्यक्तींनी पहिलाच हप्ता भरला होता. त्यांच्या पश्‍चात कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळाला आहे.
वर्षभरात पिंपळगावच्या एलआयसी कार्यालयाने नऊ हजार ७१ ग्राहकांना ४८ कोटी ५१ लाख रुपये दिले. अर्थात ११ कोटी रुपये व्यवसाय उद्दिष्टाच्या तुलनेत यंदा कोविडमुळे अवघे साडेसात कोटी रुपये विमा काढण्यात यश आले. व्यवसायात घट झालीच, शिवाय २०१९-२० च्या तुलनेत यंदा तब्बल ७० लाख रुपये अतिरिक्त परतावा द्यावा लागला. सरासरीपेक्षा सुमारे १०० मृत्यू अधिक झाले. पिंपळगाव कार्यालय यंदा काहीशा उत्पन्नात घट झाली असली तरी ग्राहकांची रक्कम मिळवून देण्यात कार्यरत सुमारे ७०० प्रतिनिधी प्रयत्नशील असतात. निफाड, सुरगाणा, देवळा, लासलगाव, विंचूर असे पिंपळगावचे कार्यक्षेत्र आहे.

हेही वाचा: नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावली


आकडे बोलतात…

वर्ष एसबी पॉलिसी, रक्कम कालावधी पूर्ण झालेल्या पॉलिसी मृत्यू एकूण

२०१९-२० ५२५२ -१६ कोटी ३४ लाख ३८६८-२७ कोटी २१ लाख २७१- ४ कोटी २७ लाख ९३९१-४७ कोटी ८३ लाख

२०२०-२१ ५०१५ -१९ कोटी १८ लाख ३६९७- २९ कोटी ३२ लाख ३५९- ६ कोटी २२ लाख ९०७१-४८ कोटी ५० लाख


गत वर्षी कोविडमुळे मृत्यू सरासरीपेक्षा १०० ने वाढले. एलआयसीने ग्राहकांचा विश्‍वास कायम ठेवत तत्काळ विमा रक्कम संबंधित कुटुंबांना अदा केली.
-अरुण सोनवणे, शाखाधिकारी, एलआयसी, पिंपळगाव बसवंत


अल्प आजाराने सहा महिन्यांपूर्वी पतीचे निधन झाले. पतीने एलआयसी विमा काढून ठेवला होता. त्यामुळे आर्थिक विवंचना भासली नाही.
-जयमाला पवार, लासलगाव

(In Pimpalgaon LIC paid more than 48 crore to customers during the Corona period)

हेही वाचा: जेमतेम साठ्यामुळे नाशिकमध्ये लसीकरण मोहिमेला पुन्हा लागणार ‘ब्रेक’

Web Title: In Pimpalgaon Lic Paid More Than 48 Crore To Customers During The Corona

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top