Nashik : पोलिस कॉन्स्टेबल जाच प्रकरणात पोलीस आयुक्तांकडून चौकशीचे संकेत

Inquiary case of Commisioner
Inquiary case of Commisioneresakal
Updated on

नाशिक : पोलिस आयुक्तालय हद्दीतील पोलिस कॉन्स्टेबलने अंमलदाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचा व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविल्याची घटनेचे वृत्त ‘सकाळ’ मधून प्रसिद्ध होताच पोलिस दलात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दखल घेत सत्यता पडताळण्यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे समजते.

शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पंचवटी पोलिस ठाण्यामध्ये कॉन्स्टेबलने बुधवारी (ता.५) रात्री अंमलदाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचा संदेश देणारा व्हिडिओ बनविला आणि तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोशल ग्रुप वर शेअर केला होता.

या घटनेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेतली. अर्ध्या रात्री पोलिस कॉन्स्टेबलची समजूत घालत त्याचे समुपदेशन केले.(In Police Constable inquiry case the Commissioner of Police signals an inquiry Nashik News)

Inquiary case of Commisioner
Pimpri chinchwad : सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या कचरा व्यवस्थापन

या संदर्भातील वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली अधिकाऱ्यांकडून सदरची बाब गुप्तता बाळगण्यात आली होती. वृत्त प्रसिद्ध झाल्याने त्याची दखल पोलिस आयुक्त यांनी गांभीर्याने घेतली. त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर घटनेबाबत चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे घटनेची सत्यता पडताळून योग्य ती कारवाई करण्याबाबत संकेत आयुक्तालयाकडून देण्यात आले आहेत.

दुजोरा मात्र कोणाकडूनच नाही

या घटनेबाबत वृत्त आल्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही, एरवी कुठली घटना घडल्यास तत्काळ कारवाई करत भाष्य करणारे अधिकारी या घटनेबाबत मात्र मौन बाळगून होते, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Inquiary case of Commisioner
Bharat Jodo : PFI, RSSवर राहुल गांधींनी केलं भाष्य; नव्या शिक्षण धोरणालाही विरोध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com