राज्यभरातील शाळांमध्ये आजपासून ‘माझे संविधान, माझा अभिमान’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यभरातील शाळांमध्ये आजपासून ‘माझे संविधान, माझा अभिमान’

राज्यभरातील शाळांमध्ये आजपासून ‘माझे संविधान, माझा अभिमान’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक: राज्यातील सर्व शाळांमध्ये मंगळवारपासून (ता. २३) शुक्रवारपर्यंत (ता. २६) ‘माझे संविधान, माझा अभिमान'' उपक्रम राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शुक्रवारी (ता. २६) सकाळी दहाला एकाचवेळी शाळा, कनिष्ठ माविद्यालयांमधून संविधानदिनानिमित्त भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले जाईल.

हेही वाचा: Repeal Three Farm Laws : अखेर नरेंद्र मोदी नमले

सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत. शालेयस्तरावर निबंध लेखन, काव्यलेखन, चित्रकला-वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये-पोष्टर निर्मिती असे उपक्रम ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा स्वरुपात राबवायचे आहेत. त्यात विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह समाजाचा सक्रीय सहभाग विभागाला अपेक्षित आहे. विद्यार्थी आणि पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्‍नमंजुषा, संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश, संविधान आणि शिक्षण या विषयावर परिसंवाद, तज्ज्ञांची व्याख्याने घ्यायची आहेत.

उपक्रमातंर्गतचे घ्यावयाचे कार्यक्रम असे : तिसरी ते पाचवी-वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला. विषय-भारतीय संविधान, माझ्या शाळेतील संविधान दिवस. वक्तृत्वमध्ये तीन मिनिटांच्या भाषणाचा व्हिडीओ, रांगोळी अथवा चित्रकलेचे छायाचित्र समाजमाध्यमांवर अपलोड करायचे आहे. सहावी ते आठवी-विषय-संविधान यात्रा, संविधान निर्मितीचा प्रवास, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय संविधान आणि लोकशाही. निबंध १ हजार शब्दांपर्यंत कागदावर लिहून त्याचे छायाचित्र, वक्तृत्वचे तीन मिनिटांच्या भाषणाचा व्हिडीओ, घोषवाक्ये आणि स्वरचित काव्यलेखन कागदाचे छायाचित्र, पोस्टरचे छायाचित्र समाजमाध्यमांवर अपलोड करायचे.

नववी ते बारावी- विषय-भारतीय संविधानिक मूल्ये, भारतापुढील सध्यस्थितीतील आव्हाने आणि भारतीय संविधान, सार्वभौमत्व संविधानाचे-जनहित सर्वांचे, भारताचा सन्मान-माझे भारतीय संविधान. निबंध, पोस्टर, भाषणाचा तीन मिनिटांची व्हिडीओ समाजमाध्यमांवर अपलोड करायचा. प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षक-फलक लेखन, डिजीटल पोस्टर निर्मिती-विषय- भारतीय संविधान, भारतीय संविधान आणि शिक्षण, भारतीय संविधानातील मूलभूत हक्क-कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, भारतीय संविधान-माझे विद्यार्थी आणि माझी भूमिका. फलक अथवा डिजीटल पोस्टर समाजमाध्यमांवर अपलोड करायचे.

loading image
go to top