godavari river
godavari riveresakal

In Situ Technology : इन सिटू तंत्रज्ञानाच्या मदतीने सांडपाणी स्वच्छ करून नदीत सोडणार

नाशिक : महापालिकेकडून (NMC) गोदावरी नदीसह उपनद्या व गोदावरीला मिळणाऱ्या नाल्यांच्या स्वच्छतेसाठी पावले उचलली आहे.

एकूण १९ नाल्यांपैकी पाच नाल्यांची स्वच्छता पहिल्या टप्प्यात हाती घेतली जाणार आहे. (in situ technology help waste water will be cleaned and released into river nashik news)

आयआयटी पवईने विकसित केलेल्या इन- सिटू तंत्रज्ञानाच्या आधारे सांडपाण्यावर स्वच्छता करून नदीत सोडले जाणार आहे. गोदावरी नदी स्वच्छतेसाठी महापालिकेकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. नमामि गोदा प्रकल्पांतर्गत सांडपाण्याचे नाले मलनिस्सारण केंद्राकडे वळविले जाणार आहे.

स्मार्टसिटी कंपनीकडून गोदाघाट सौंदर्यीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गोदावरी नदी, उपनदी व गोदावरीला मिळणारे १९ नाले प्रदूषणमुक्त करण्यासाठी आयआयटी पवईचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. मुंबईतील मिठी नदी स्वच्छतेसाठी हेच तंत्रज्ञान वापरण्यात आले होते.

आयआयटी शास्त्रज्ञांच्या पथकाने कार्बन नाला, चिखली नाला, मल्हारखान, चोपडा नाला, बजरंग नाला, भारतनगर, पुणे रोडवरील बजरंगवाडी, फेम चित्रपटगृहामागील नाला, सुंदरनगर, रोकडोबावाडी नाला, चेहडी या ठिकाणी शास्त्रज्ञांनी पाहणी केली. सर्वेक्षणाचा अहवाल महापालिकेला सादर केला.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

godavari river
Soldier Missing: पालकमंत्री भुसेंना ग्रामस्थांचा घेराव; जलसंपदा विभागाच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केला आक्षेप

पहिल्या टप्प्यात सर्वाधिक प्रदूषित असलेल्या चिखली, डोबी, वाघाडी, विजय- ममता नाला या नैसर्गिक नाल्यांमधील प्रदूषित पाणी इन- सीटू प्रक्रियेनुसार स्वच्छ करून नदीत पाणी सोडले जाणार आहे. नदी पात्रात ज्या ठिकाणी प्रदूषित नैसर्गिक नाला मिळतो तेथे दोनशे मीटर अंतरावर पाणी अडविले जाणार आहे.

अडविलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी नाल्यातूनच पुढे सोडले जाणार आहे. पाच नाल्यांवर स्ट्रक्चर उभे केले जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. या पाच नाल्यांवर प्रयोग यशस्वी झाल्यानंतर उर्वरित चौदा नाल्यांवर पाणी स्वच्छतेची प्रक्रिया राबविली जाईल.

"गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटी पवईमार्फत शहरातील नैसर्गिक नाल्यांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले आहे.त्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच प्रदूषित नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीकरिता इन-सीटू प्रक्रियेनुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम पायलट प्रोजेक्ट म्हणून हाती घेतले जाणार आहे." - शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका.

godavari river
Dada Bhuse News: जवान सापडत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार : पालकमंत्री दादा भुसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com