Soldier Missing: पालकमंत्री भुसेंना ग्रामस्थांचा घेराव; जलसंपदा विभागाच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केला आक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Villagers gathered around dada bhuse

Soldier Missing: पालकमंत्री भुसेंना ग्रामस्थांचा घेराव; जलसंपदा विभागाच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केला आक्षेप

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानाच काल दुचाकीवरून तोल जाऊन गोदावरी उजवा कालव्यात पडल्याने कुटुंबातील पत्नी मुलगा मुलीला वाचविण्यात यश आलेले असून त्यानंतर जवान हा वाहून गेल्याने सुमारे 18 ते 20 तास होऊन अजूनही शोध लागलेला नसताना एन डी आरचे पथक गुरुवारी सायंकाळपासून दाखल झालेले असून शोध सुरू आहे. (Soldier Missing case Guardian Minister dada bhuse arrived at chondi Objections expressed to functioning of Water Resources Department nashik news)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

तसेच शुक्रवारी शोध मोहीम सुरू असून पालकमंत्री दादा भुसे हे घटनास्थळी दुपारी एक वाजता दाखल झाले असता, समस्त पंचकोशीतील गावकऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना घेराव घालत सुमारे वीस तास उलटूनही शोध लागत नसल्याचे सांगितले.

तसेच गोदावरी कालवा पाठ हा गुरुवारी रात्री का बंद केला नाही, यासाठी पालक मंत्र्यांना जाब विचारण्यात आला. तसेच जलसंपदा विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नातेवाईक व ग्रामस्थांनी आक्षेप व्यक्त केला आहे. तसेच मालेगाव व नाशिक येथील बचाव पथके हे घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी देखील रात्री आवर्तन बंद करायला असमर्थता दर्शवल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. त्यामुळेच पालकमंत्री घटनास्थळी आल्यावर नागरिकांनी रोष व्यक्त केला. सदर बेपत्ता जवानाच्या पायातील बूट दहिवडी शिवारात बचाव पथकाने लावलेल्या संरक्षक जाळीमध्ये अडकल्याचे सकाळी आढळले.