esakal | nashik : मित्रा अन्‌ मजिप्रा कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्‌घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

मित्रा अन्‌ मजिप्रा कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक रोड येथील विभागीय आयुक्तालयाशेजारील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (मित्रा) व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजिप्रा) मुख्य अभियंता कार्यालयाचे गुरुवारी (ता. ३०) दुपारी साडेबाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन होईल.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे अध्यक्षस्थानी असतील. हा कार्यक्रम ऑनलाइन होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेते प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, कृषीमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

खासदार हेमंत गोडसे, आमदार डॉ. सुधीर तांबे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, प्रा. देवयानी फरांदे, ॲड राहूल ढिकले, सरोज अहिरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, आनंद लिमये, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे हेही उपस्थित राहणार आहेत, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे.

loading image
go to top