Nashik Market Committee : नाशिक बाजार समितीचे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत 4 कोटी 96 लाखांनी वाढले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Market Committee nashik

Nashik Market Committee : नाशिक बाजार समितीचे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत 4 कोटी 96 लाखांनी वाढले!

पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक बाजार समितीत मागील वर्षी एप्रिल ते डिसेंबर २०२१ मध्ये ११ कोटी ९३ हजार नऊशे ९० रुपये उत्पन्न झाले होते. एप्रिल ते डिसेंबर २०२२ या महिन्यात १४ कोटी ३९ लाख १० हजार ४०३ उत्पन्न झाले. मागील वर्षीच्या तुलनेत गतवर्षी ३ कोटी ३० लाख १७ हजार ३१२ रुपयांनी वाढ झाली.

तसेच, १ कोटी ६६ लाख ५६ हजार ३० रुपये इतकी खर्चात कपात केली, असे एकूण ४ कोटी ९६ लाख ७३ हजार ३४४ रुपये उत्पन्न वाढ झाल्याची माहिती नाशिक बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलाणी यांनी दिली. (income of Nashik Market Committee increased by 4 crore 96 lakhs compared to last year nashik news)

नाशिक मुख्य मार्केट यार्डात गाळ्यांच्या उत्पन्नात २४ लाख १५ हजार ६४१ रुपयांनी वाढ झाली. तर पेठ रोड मार्केट यार्डात १५ लाख ११ हजार ८३४ रुपयांनी वाढ झाली. तर इतर ५१ लाख २८ हजार ९०६ रुपये उत्पन्न झाले आहे. फ्रूट मार्केटमध्ये प्रतिदिन वसुलीत वाढ झाली आहे. तसेच मुख्य मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर होणारी बाजार शुल्काची वसुलीदेखील वाढली आहे.

एफसीआयकडे थकीत असलेली बाजार फी ४१ लाख ३६ हजार ६०४ रुपये पत्रव्यवहार करत वसूल केले. पेठ रोड येथील पक्के गाळे तसेच पंचवटी मार्केट यार्ड येथील पक्के व पत्र्यांचे गाळे यांचे थकीत असलेले भाडे वसुल करण्यासाठी आदेश कर्मचाऱ्यांना करण्यात आलेले आहेत.

बाजार समितीच्या खर्चात कपात करत १ कोटी ६६ लाख ५६ हजार ३० रुपये करण्यात आलेली आहे. अनावश्यक खर्चावर आळा घातला असून, कर्मचारी पगार, स्वच्छता, सुरक्षा या व्यतिरिक्त अन्य कोणताही खर्च केला जात नसल्याचे मुलाणी यांनी सांगितले.

हेही वाचा: Nashik News : दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था; खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त

शासकीय देणी दिली

प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कृषी पणन मंडळाची बाजार समितीकडे असलेली मागील थकीत असलेली अंशदानाची सुमारे ६३ लाख ९९ हजार ९२३ रुपये व चालू अंशदान ८१ लाख २३३ रुपये अशी एकूण १ कोटी ४५ लाख १५६ रुपये पणन मंडळास अदा केली आहे.

तसेच शासनाची फी ६१ लाख ६९ हजार ९२० रुपये व टीडीएस रक्कम ८१ हजार रुपये असे एकूण २ कोटी ७० लाख ७९ हजार २३६ रुपये शासनास अदा करण्यात आली आहे.

सिक्युरिटी खर्चात कपात

बाजार समितीची सिक्युरीटी एजन्सीचा कालावधी डिसेंबर २०२२ मध्ये संपुष्टात आल्याने सिक्युरीटी सेवा बंद केली. बाजार समितीमध्ये कार्यरत असलेले शिपाई व पहारेकरी यांच्या कामकाजाचे नियोजन करून त्यांच्याकडूनच कामे करून घेतली आणि दरमहा सिक्युरिटीवर होणारा एकूण खर्च ७ लाख ७२ हजार ३१० रुपये इतका कमी केला,२०२३ च्या अखेरीस ९२ लाख ६७ हजार ७२० रुपये बचत झाली.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik News : येळकोट येळकोटच्या गजराने दुमदुमली चंदनपुरी! लाखावर भाविक खंडेरायाच्या चरणी

उपक्रम राबविले

प्रशासक फयाज मुलाणी यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात पदभार स्वीकारला. बाजार समितीतील सचिव अरुण काळे, सहायक सचिव एन. एल. बागूल, पी. एन. घोलप, अभियंता रामदास रहाडे, सॅनिटरी निरीक्षक व कर्मचारी यांना समवेत घेतले.

नाशिक बाजार समितीत नेत्र तपासणी, सर्वरोग निदान शिबिर, एड्स जनजागृती पथनाट्य, सीमा शुल्क पथनाट्य घेतले. हे सर्व बाजार घटकांसाठी उपक्रम राबविले.

हेही वाचा: Nashik News : गावकारभाऱ्यांना मिळणार ओळखपत्र; ग्रामपंचायत विभागाचे आदेश

टॅग्स :Nashikmarket committee