सटाणा- प्रशासकीय कारकिर्दीत शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदीप व्यवस्था, अग्निशमन सेवा यांसारख्या दैनंदिन सेवा सुरळीत चालतात. फरक पडतो तो विकास कामांसाठी शासकीय निधी खेचून आणताना राजकीय व्यवस्थेकडून कडून जसा प्रयत्न होतो तसा प्रयत्न प्रशासकीय कारकिर्दीत झाला नाही . त्यामुळे विकास कामांचा अनुशेष वाढत जाऊन शहराच्या विकासात खीळ बसली व त्याचाच विपरीत परिणाम झाल्याचे चित्र प्रशासकीय कारकिर्दीत अनुभवयास मिळाल्याचे चित्र आहे.