Dengue Patients : डेंगीच्या रुग्णसंख्येत जूनमध्ये वाढ! 6 महिन्यात रुग्णांची संख्या शंभरी पार

Dengue patients increase
Dengue patients increaseesakal

Dengue Patients : शहरात डेंगीची रुग्ण वाढत असल्याचे चित्र असून जानेवारीपासून बाधितांचा आकडा १०३ झाला आहे. यंदाच्या जून महिन्यात १३ डेंगी रुग्ण आढळले.

पावसाळ्यातील बदलत्या हवामानामुळे शहरात दरवर्षी स्वाइन फ्लू, डेंगी, साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. यंदा स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव दिसत नसला तरी, डेंगीचे तेरा रुग्ण आढळले आहे.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात शहरात रिमझीम पावसाला सुरवात झाली असून पुढच्या तीन- चार महिन्यात पावसाचा अंदाज असल्याने नाशिककरांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. (Increase in number of dengue patients in June 6 months number of patients crossed one hundred nashik)

विशेषत: पावसाळ्यात डेंगीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी नऊ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. मात्र जूनमध्ये रुग्णांचा आकडा वाढून तो तेरावर गेला आहे.

डेंगी हा विषाणूजन्य आजार असून ‘एडिस इजिप्ती’ प्रजातींच्या डासांपासून होता. पावसाळा सुरू झाल्यापासून डेंगी रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडगळीला पडलेल्या वस्तूंमध्ये साचलेले पाणी, नारळ, टायर, पाण्याचे डबके यामुळे डेंगी होण्याची शक्यता असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dengue patients increase
Nashik Monsoon Rain: इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस! सलग दुसऱ्या दिवशी हजेरी

नागरिकांनी घराजवळचा परिसर स्वच्छ करून कुठेही पाणी साठणार नाही याची त्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, डेंगी बाधितांचा आकडा वाढत असल्याने वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला नागरिकांची चिंता असेल असे वाटत होते. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असून शहरात कुठेही नियमितपणे पेस्ट कंट्रोलचे काम होत नसल्याची ओरड आहे.

Dengue patients increase
NMC School Uniform: मनपा विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा विषय मार्गी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com