Retire Worker Pension : निवृत्तिवेतनात 20 ते 100 टक्क्यांपर्यंत वाढ; 75 हजार जणांना लाभ

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २० ते १०० टक्यापर्यंत निवृत्तिवेतनात वाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
pension.
pension.sakal
Updated on

Retire Worker Pension : राज्य शासकीय, निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या व वयाची ८० वर्ष पूर्ण केलेले व त्यावरील वय असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २० ते १०० टक्यापर्यंत निवृत्तिवेतनात वाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

१ जानेवारी २०२४ पासून हा निर्णय लागू करण्यात आला असून त्याचा राज्यातील सुमारे ७५ हजार निवृत्तिवेतनधारकांना लाभ मिळणार आहे. (Increase in pension from 20 to 100 percent to retire worker nashik news )

राज्य शासकीय तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली महाविद्यालय कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या ८० वर्ष व त्या पुढील वयाच्या निवृत्तीवेतनधारकांना कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

राज्यात सध्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुमारे ७ लाख संख्या आहे त्यातील १० टक्के ही ८० वर्षावरील निवृत्तिवेतनधारकांची संख्या आहे, त्यानुसार या निर्णयाचा सुमारे ७५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल, अशी माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी दिली.

pension.
Retirement Savings : निवृत्तीसाठी बचत करणाऱ्यांची संख्या झाली कमी, महिलांची आकडेवारी चिंताजनक; अहवालात बाब उघड

वाढीव स्वरूप

वय वर्ष ८० ते ८५ मूळ निवृत्तिवेतनात २० टक्के वाढ

वय वर्ष ८५ ते ९० मूळ निवृत्तिवेतनात ३० टक्के वाढ

वय वर्ष ९० ते ९५ मूळ निवृत्तिवेतनात ४० टक्के वाढ

वय वर्ष ९५ ते १०० मूळ निवृत्तिवेतनात ५० टक्के वाढ

वय वर्ष १०० पेक्षा अधिक मूळ निवृत्तिवेतनात १०० टक्के वाढ

pension.
Old Pension: जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर तोडगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com