Nashik : आठवडे बाजारात महिलांचे बजेट कोलमडले; जाणुन घ्या कसे? | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vegetables price hike latest marathi news

Nashik : आठवडे बाजारात महिलांचे बजेट कोलमडले; जाणुन घ्या कसे?

नाशिक : पावसाची (Rain) रिपरिप सुरूच असल्याने बाजार समितीतील सर्वच प्रकारच्या भाज्यांची (Vegetables) आवक मंदावली आहे. त्याचा परिणाम बुधवारी (ता.२७) आठवडे बाजारात सर्वच भाज्यांच्या दराने तेजी गाठल्याने गृहिणींचे आठवड्याचे बजेट कोलमडले आहे. (Increase in prices of all vegetables in weekly market due to rain nashik latest marathi news)

गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभर पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. त्याचा परिणाम आज आठवडे बाजारावर झाल्याचे जाणवले.

मेथी, कोथिंबीरच्या आवकेत मोठी घट झाल्याने मेथीच्या जुडीसाठी ३० रुपये, तर कोथिंबिरीच्या जुडीसाठी ४० रुपये मोजावे लागत होते. पावसामुळे पालक गायब झाली आहे. गत महिन्यात ८० रुपयांपर्यंत पोचले. टोमॅटो आता ३० रुपये किलोपर्यंत घसरला आहे.

पूर ओसरल्याने बाजार घाटावर

संततधारेमुळे गोदावरी जवळपास संपूर्ण जुलै महिने दुथडी वाहत होती. कालपासून पावसाने उघडीप दिल्याने आता पाणी कुंडात परतले आहे.

त्यामुळे गत आठवड्यात चक्क गाडगे महाराज पुलावर पोचलेला बाजार आज मूळ जागी म्हणजे गंगाघाटावरच भरला होता.

हेही वाचा: चार आण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला; पूर्व कार्यालय आगीतून फुफाट्यात

इतर भाज्यांचे दर असे (किलोमध्ये)

क्रम भाज्या दर

१. वांगी ६० रुपये

२. हिरवी मिरची ८० ते १००

३. भेंडी ८० ते १०० रुपये

४. शेवगा ८० रुपये

५. टोमॅटो ३० रुपये

६. फ्लॉवर गड्डा १५ ते २० रुपये

७. कोबी गड्डा १० ते १५ रुपये.

हेही वाचा: शाळा दुरुस्तीसाठीचे 19 लाख अखर्चित; जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश

Web Title: Increase In Prices Of All Vegetables In Weekly Market Due To Rain Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..