Nashik News : अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात वाढ

Nashik News : अंगणवाडी सेविका  मदतनीस यांच्या मानधनात वाढ
esakal

Nashik News : महापालिकेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधन वाढीला आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी मान्यता दिली आहे. (Increase in salary of Anganwadi Sevika Helper nashik news)

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाडीत मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर कार्यरत आहेत.

अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका यांचे मानधनात मासिक दोन हजार रुपये, अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनात मासिक सोळाशे रुपये वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik News : अंगणवाडी सेविका  मदतनीस यांच्या मानधनात वाढ
Nashik News : स्वातंत्र्यानंतर प्रथमच या गावात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळाली बससुविधा

मुख्य सेविका यांचे सुधारित मानधन रुपये साडेआठ हजार रुपये, अंगणवाडी सेविकांचे दरमहा सात हजार ६२० रुपये, अंगणवाडी मदतनीसांचे मासिक सात हजार रुपये सुधारित मानधन झाले आहे.

पाच मुख्य सेविका, ३०५ अंगणवाडी सेविका व ३०२ मदतनीस कार्यरत आहेत. अशी माहिती समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली.

Nashik News : अंगणवाडी सेविका  मदतनीस यांच्या मानधनात वाढ
Rakshabandhan 2023 : यंदा बाजारात खास ‘ईव्हील आय’ राखी! आकर्षण राख्यांनी बाजारपेठ फुलली

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com