Nashik News : स्वातंत्र्यानंतर प्रथमच या गावात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळाली बससुविधा

Villagers welcoming the first bus for students after independence.
Villagers welcoming the first bus for students after independence. esakal
Updated on

अरुण हिंगमिरे ः सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जातेगावपासून पाच किलोमीटरवर डोंगराच्या कुशीत असलेल्या चंदनपुरी येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी (ता.२२) परिवहन महामंडळाची बस गावात विद्यार्थी घेण्यासाठी आली अन ग्रामस्थांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

आगार व्यवस्थापकांचा माणुसकीमुळे हे घडल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. मानव विकासच्या या बसमुळे विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. (first bus for students after independence in chandanpuri nashik news)

या बसचे चालक एम.व्ही. खैरे यांचा येथील नागरिकांनी आणि वाहक सौ. एम. व्ही. सोनवणे यांचा विद्यार्थिनी तेजस्विनी जाधव यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. बसला पुष्पहार घालून श्रीफळ वाढवून पूजा केली.

चंदनपुरी या गावातून रोज पाच किलोमीटरची पायपीट करून जातेगाव येथील जनता विद्यालय येथे पाचवी ते १२ वीपर्यंतचे ४३ विद्यार्थिनी व ४१ विद्यार्थी आणि वसंतनगर येथील साईज्ञान मंदिर विद्यालयात पाचवी ते १२ वीपर्यंत ४३ विद्यार्थिनी व ४१ विद्यार्थी असे १६४ विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. देशाच्या स्वातंत्र्यानंतर नागरिकांनी यापूर्वी अनेकदा परिवहन महामंडळाच्या नांदगाव आगाराला पत्र व्यवहार केला, परंतु येथे बस सुरू होऊ शकलेली नव्हती.

७ ऑगस्टला नांदगावचे परिवहन महामंडळचे व्यवस्थापक हेमंत पगार, वाहतूक निरीक्षक मयूर सूर्यवंशी, सहवाहतूक निरीक्षक विनोद इपर, विलास गिते, भाऊसाहेब राऊत, सानप हे अधिकारी कामानिमित्त येथे आले असता त्यांनी १६४ विद्यार्थी चालत शाळेत जात असल्याचे त्यांना आढळून आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Villagers welcoming the first bus for students after independence.
Nashik Dengue Disease : डेंगी चाचणीसाठी 600 रुपये दर; रुग्णांची आर्थिक लुट

त्यांनी आपले वाहन थांबवून यापैकी काही विद्यार्थ्यांना जवळ बोलावून चौकशी केली असता त्यांना दररोजच्या विद्यार्थ्यांच्या पायपिटीबाबत समजले. त्यांनी तातडीने निर्णय घेऊन कागदोपत्री प्रस्ताव तयार करून परिवहन महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास सादर केला व अल्पावधीतच येथील विद्यार्थ्यांची पायपीट थांबविल्याने गावातील सर्व नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मनस्वी आनंद झाला.

बसच्या स्वागतप्रसंगी माजी उपसरपंच संतोष डांगे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव, बाळू जाधव, मधुकर निबांरे, परेलाल जाधव, योगेश जाधव, ईश्वर राठोड आणि नागरिक उपस्थित होते. त्यांनी आगार व्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Villagers welcoming the first bus for students after independence.
Nashik News : दादा भुसेंनी दत्तक घेतलेल्या गावाचे डाळिंब साता समुद्रापार! जागेवरच मिळाला 120 रुपये भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com