शालेय साहित्याच्या भावात वाढ; पालकांची होणार दमछाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School Bags

शालेय साहित्याच्या भावात वाढ; पालकांची होणार दमछाक

नरकोळ (जि. नाशिक) : नवीन शैक्षणिक वर्षाला (Education year) पुढील महिन्यात प्रारंभ होत असून, यंदा कागदाचे व कच्च्या मालाचे भाव वाढल्याने यंदा शैक्षणिक साहित्यात ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. भाववाढीमुळे पालकांना महागाईशी सामना करावा लागणार आहे. बाजारात नवनवीन नोटबुकसह विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. शालेय साहित्याबरोबरच मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पुरक असलेली खेळणी व अभ्यासाला हातभार लावणाऱ्या शैक्षणिक वस्तू उपलब्ध आहेत. (Increase in the price of school materials Nashik News)

शालेय साहित्य विक्रीत विविध कंपन्याची रस्सीखेच असून, दर्जदार सहित्यास ग्राहक आकर्षित होत आहे. नोटबुक कंपासपेटी, पॅड, लहान मुलांना वापरात असलेली पाटी, पेन, दप्तर, अंकलिपी या वस्तूंना वाढती मागणी आहे. ग्रामीण भागातील आठवडे बाजारामध्येही शैक्षणिक साहित्य विक्रीस असून, पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. पुस्तके मोफत मिळणार असले तरी वह्यांचे नानाविध प्रकार बाजारात आले आहेत.

हेही वाचा: नाशिक : फुकट्यांकडून साडेबारा कोटींची वसुली

बहुरंगी वह्याना पसंती
बदलत्या काळानुसार मुलांना आवडणारे किक्रेट खेळाडू, चित्रपट कलावंत, निसर्ग रम्य चित्र, फुले पक्षी, प्राणी, कार्टुन या छायाचित्रासह बहुरंगी वह्यांना मुले पसंती देत आहे.

हेही वाचा: Nashik : बहुप्रतिक्षित निओ मेट्रोचे मार्ग निश्‍चित

असे आहेत दर
(एक डझनचे भाव)
१०० पेजेस वह्या - १३२ ते २१६ रुपये
२०० पेजेस वह्या - २१६ ते ३६० रुपये
लॉंग बुक : १०० पेजेस - २१६ ते ३०० रुपये
लॉंग बुक : २०० पेजेस - २४० ते ४०० रुपये
ए फोर साईज - ३०० ते ८०० रुपये
कंपासपेटी - ५० पासून ते ३०० रुपयापर्यंत

"गेल्यावर्षीपेक्षा यंदा शैक्षणिक साहित्यात दरवाढ झाली असून, त्यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे. परंतु, बालकांच्या मनाप्रमाणे साहित्य विक्रीस होत आहे."
- उदय ब्राह्मणकार, संचालक, दीपक स्टोअर्स, सटाणा


"शालेय साहित्यात भाववाढ झाली आहे. असे असले तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून साहित्य घ्यावे लागणार आहे."
- कैलास पवार, पालक, नरकोळ, ता. बागलाण

Web Title: Increase In The Price Of School Materials Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikschoolmaterials
go to top