
नाशिक : वाढीव लोकसंख्येच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली प्रभागरचना (Ward Formation) व मतदारांची संख्या लक्षात घेऊन मतदान केंद्रांची संख्यादेखील वाढणार आहे. मागील निवडणुकीत एक हजार ४०५ मतदान केंद्रे होती.
यंदाच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात दीड हजार मतदान केंद्रे असतील. प्रशासनाच्या नियोजनानुसार यात आणखी वाढ होईल. अंतिम मतदारयादी घोषित करण्यात आल्यानंतर प्रभागनिहाय मतदारयाद्यांचे विभाजन होईल.
त्यानंतर मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात ओबीसी आरक्षणानुसार जागा निश्चित होण्याची शक्यता आहे. (Increase of 100 Polling Stations nashik Latest NMC Election News)
ओबीसी आरक्षणावरून निवडणुका लांबणीवर पडल्या तरी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुकांची तारीख घोषित करण्याच्या सूचना दिल्याने त्यानुसार प्रशासनानेदेखील जोरदार तयारी सुरू केली आहे. यापूर्वीच्या तयारीच्या तिसऱ्या टप्प्यात अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आता बूथनिहाय मतदारयाद्या घोषित करण्याचे नियोजन सुरू झाले आहे.
अर्थात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच बूथनिहाय मतदारयाद्यांची प्रसिध्दी होईल. दरम्यान, अंतिम मतदारयाद्या आता अधिकृत संकेतस्थळावरदेखील लोड झाल्याने सर्वांनाच आता अंतिम मतदारयाद्या पाहता येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या सूचनेनुसार मतदान केंद्रात मतदार संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मतदान केंद्रनिहाय (बूथ) मतदारयाद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नाशिक महापालिका हद्दीत बारा लाख ३७२ मतदार आहेत. एका मतदान केंद्रात आठशे ते नऊशे मतदार राहणार असल्याने त्यानुसार दीड हजार मतदान केंद्रे राहतील. नियमानुसार दहा टक्के मतदान केंद्रे राखीव ठेवावी लागणार असल्याने त्यापेक्षा अधिक मतदान केंद्रे राहतील.
२०१७ च्या निवडणुकीत एक हजार ४०७ मतदान केंद्रे होती. दीड हजार मतदान केंद्रासाठी नऊ हजार मतदार कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे.
३६ जागांवर नव्याने आरक्षण
सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा केल्यानंतर आता १३३ पैकी ३६ जागांवर नव्याने आरक्षण टाकावे लागणार आहे. निवडणुकीची तयारी पूर्ण होण्याच्या अगोदर आरक्षण टाकावे लागणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात आरक्षणाची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.