Nashik : जिल्ह्याच्या पत आराखड्यात 672 कोटींचा वाढ

credit plan amount
credit plan amountesakal

नाशिक : जिल्ह्यातील कृषी व लघुउद्योगांच्या विकासाला (Development of agriculture and small scale industries) चालना देण्याच्या उद्देशाने प्रशासनाकडून २०२२-२३ या वर्षाकरिता तब्बल २३ हजार २७२ कोटींचा पतपुरवठा आराखडा (Credit plan) तयार करण्यात आला आहे. यात कृषी पीककर्जासाठी (Agricultural Crop Loan) एकूण तीन हजार ६५०, तर शेतीच्या उपक्रमांसाठी दोन हजार ५८१ असा सहा हजार २३१ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लघुउद्योगांनादेखील चालना देण्यासाठी सहा हजार ५२३ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. एकूणच मागील वर्षीच्या २२ हजार ६०० कोटींच्या पत आराखड्यात चालू आर्थिक वर्षात ६७२ कोटींची वाढ करण्यात आली आहे. (increase of Rs 672 crore in credit plan of district Nashik News)

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २६) बँक प्रतिनिधींसोबत जिल्ह्याच्या पत आराखड्यासंदर्भात बैठक झाली. स्टेट बँक ऑफ इंडिया व सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक, जिल्ह्यातील बँकांचे प्रतिनिधी, तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे अग्रणी अधिकारी आर. आर. पाटील उपस्थित होते.

credit plan amount
नाशिक : खरीप हंगामासाठी 17 हजार हेक्टरवर पेरणी

२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या २३ हजार २७२ कोटींच्या पत आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये कृषी विभागासाठी सहा हजार २३१ कोटींची भरीव तरतूद आहे, तर इतर यात खासकरून सेंद्रिय शेती, कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, हरितगृह, कृषी निर्यात योजना, फुले व फळबाग लागवड, शेतीपूरक व दुय्यम योजनांचा समावेश करण्यात आला आहे. लघुउद्योगांनादेखील चालना देण्यासाठी सहा हजार ५२३ कोटींची, तर इतर प्राधान्य उपक्रमांसाठी सहा हजार १९३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षातील पत आराखड्यात करण्यात आलेल्या ६७२ कोटींच्या वाढीव तरतुदीमुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त, कर्जबाजारी, नापिकीने त्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच मदत करणे सोपे होणार आहे.

credit plan amount
नाशिकला CNG संपला; गॅस संपल्यामुळे तारांबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com