
नाशिकला CNG संपला; गॅस संपल्यामुळे तारांबळ
नाशिक : सीएनजीचा (CNG) पुरवठा करणाऱ्या विल्होळी येथील मदर स्टेशनमधीलच सीएनजी गॅस संपल्यामुळे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. (Nashik runs out of CNG Nashik News)
महापालिकेने (NMC) सीएनजी बस (CNG Bus) सुरू करण्याअगोदर कंपनीने महापालिकेला कुठल्याही परिस्थितीत बसला गॅस कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले होते. सीएनजीचे पंप शहरात सुरू झाले आणि सीएनजीच्या वाहनांत वाढ होऊ लागली. गुरुवारी मोठ्या प्रमाणात सीएनजी गाड्या आल्या असून, शहरात ठिकठिकाणी सीएनजी पंप सीएनजी गॅसच्या प्रतीक्षेत आहेत.
हेही वाचा: Nashik : बनावट फेसबुक वरून पैशांची मागणी; सायबर सेलकडे करावी तक्रार
शहरात किमान दहा पंप तयार असून, त्यांपैकी निवडक चार ते पाच पंप सुरू आहेत. त्यात विल्होळी येथील पंप २४ तास खुला असतो, कंपनीचा हा पंप सुरू राहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची तेथे गर्दी होते. गुरुवारी मात्र सायंकाळीच मदर स्टेशनमधील गॅस संपल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात सीएनजीचे काय, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा: Nashik : लग्नातील या प्रथा बंद कराच!
एकच पंप बंदमुळे अडचणी
शहरात विल्होळी, पाथर्डी फाटा, दसक, पंचवटी, नाशिक रोड, शिंदे पळसे येथे सीएनजी पंप आहेत. त्यांपैकी विल्होळी येथील एकमेव मदर पंप चोवीस तास सुरू असतो. पाथर्डी फाटा येथील पंप सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत सुरू असतो, तर दसकसह उर्वरित पंप सकाळी सात ते अकरापर्यंत सुरू असतात. चोवीस तास चालणारा एकमेव पंप बंदमुळे दिवसभर अडचण निर्माण झाली.
Web Title: Nashik Runs Out Of Cng Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..