कच्चा मालाच्या किंमतीत वाढ; उन्हाळ्यात बर्फ गोळा, कुल्फी महागणार

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने व्यावसायिकांनी घेतला मोकळा श्‍वास
ice
icesakal
Updated on

मालेगाव : कोरोना व लॉकडाउनमुळे दोन वर्षापासून शीतपेयांची दुकाने बंद होती. या वर्षी कोरानाची तिसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे व्यवसायांना गती मिळत आहे. मालेगाव शहर व परिसरात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे रसवंती, शीतपेय, पेप्सी, लस्सी, कुल्फी, बर्फ गोळा, लिंबू शिकंजी आदींना मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे. शहरात, रस्त्याच्या कडेला शीतपेय विक्रीची दुकाने लागली आहेत. यातून अनेक नागरिकांना रोजगार मिळणार आहे.

दोन वर्षापासून कोरोना व लॉकडाउनमुळे शीतपेयांची दुकाने बंद होती. यावर्षी कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. निर्बंध काही प्रमाणात शिथील झाले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनीही मोकळा श्‍वास घेतला आहे. बंद पडलेल्या शीतपेयांच्या चाकांना गती मिळत आहे. येथे ३० ते ४० रसवंतीचे दुकाने आहेत. तसेच लिंबू शिकंजीच्या आठ हातगाड्या आहेत. शहरातील पूर्व-पश्‍चिम भागात बर्फाचा गोळा विक्री करणाऱ्या अनेक व्यावसायिकांच्या हातगाड्या विक्रीसाठी दिसू लागल्या आहेत. येथील सटाणा नाका, मोसमपूल, स्टेट बँक चौक, महात्मा फुले रस्ता, रावळगाव नाका, चर्चगेट तसेच मालेगाव ते सटाणा रस्त्यावर, चाळीसगाव फाटा, मुंबई-आग्रा महामार्गावर रस्त्याच्या कडेला, तसेच पूर्व भागात गल्ली-मोहल्ल्यात अनेक दुकाने लागली आहेत. यातच रसवंती विकणाऱ्या व्यावसायिकांनी शक्कल लढवून गाडीवरच ऊस गाळपाचे यंत्र बसविले आहे. यासह शहरात पेप्सी, लस्सी, आईस्क्रीम, कुल्फी, मसाले ताकाची दुकाने लागली आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेत महागाईचा फटका या व्यवसायाला बसला आहे. शीतपेयांच्या किमतीतही वाढ झाली आहे. यावर्षी लग्नसराईची धूम आहे त्यामुळे शीतपेयांना मागणी वाढणार आहे.

पदार्थाचे नाव गेल्या वर्षीचे दर यावर्षीचे दर

  • पेप्सी तयार करण्यासाठी

  • लागणारे पिशवी दर १०० रुपये सध्या १२० रुपये

  • गोळा मशिन २५०० ३००० रुपये

  • पेप्सी मशिन १८०० २२००

  • जिरा सोडा ६० ९० रुपये

  • लिंबू शिकंजी १ १५ रुपये

  • उसाचा रस १० २० रुपये ग्लास

  • कुल्फी १२ १५ रुपये

महागाईमुळे उसाचे, कुल्फी, पेप्सी, लस्सी तयार करण्यासाठी लागणारे कच्च्या माल महाग झाला आहे. यामुळे शीतपेयांच्या किंमती वाढल्या आहेत.

- हर्षल कापसे, कुल्फी विक्रेता, मालेगाव

रसवंतीला लागणारा ऊस नाशिक, निफाड येथून येतो. मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी ऊसाचे भाव टनामागे पाचशे ते हजार रुपयांनी वाढले आहेत.

- दीपक शेवाळे घाऊक व्यापारी, चांदोरी, ता. निफाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com