Climate Change: वातावरण बदलाने वाढली डोकेदुखी! सकाळी ऊन, दुपारी ढग अन् संध्याकाळी पाऊस, घ्या ही काळजी

Climate Change Health
Climate Change Health esakal
Updated on

विकास गिते

Climate Change : सकाळी उन्हाचा चटका, दुपारी ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी असे एकाच दिवसातील वातावरणामुळे सिन्नरकरांची 'डोकेदुखी' वाढली आहे.

ताप, थंडी आणि डोकेदुखीमुळे 'अशक्त' झाले असल्याचे निरीक्षण शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. (Increased headache with climate change take care of yourself nashik)

गोष्टींचा अवलंब करा

■ सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाऊ नका

■ उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका

■ फ्रीजमधील पाणी पिऊ नका

उकळून गार केलेले पाणी प्या

■ ताजे आणि गरजअन्न पदार्थ खा

■ घराबाहेर पडतानारेनकोट, जर्किन किंवा छत्री घ्या

असे बदलतेय वातावरण

शहरात गेल्या १५ दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. जूनच्या शेवटी पावसाचा जोर वाढला. दमदार सरी पडल्या. पण, त्यानंतर पावसाने 'ब्रेक' घेतला. आकाश अंशतः ढगाळ होऊ लागले. त्यामुळे सकाळपासून दुपारपर्यंत उन्हाचा चटका परत जाणवू लागला.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हे वातावरण अनुभवत असल्याने याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. विशेषत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजारांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या रुग्णांनी अंथरूण धरले असल्याचेही विविध वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Climate Change Health
Climate Change : ढगाळ वातावरणाने पुन्हा धास्तावला बळीराजा! बदलत्या वातावरणामुळे वाढल्या आरोग्याच्या समस्या

वातावरणातील बदलामुळे खालील आजारांमध्ये वाढ

■ कोरडा खोकला, सर्दी, ताप, •डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली

■ घरातील एकाला सर्दी-खोकला झाल्यास त्याच्यामुळे इतरांनाही संसर्ग

■ श्वसन संसर्गाच्या रुग्णांत वाढ

"पावसाळ्यात बाहेरील अन्नपदार्थ शक्यतो टाळावे थंड पाणी येऊ नये. पावसात केस ओले झाले तर लगेच ते सुकवावे बाहेर निघताना रेनकोट छत्री याचा अवलंब करावा. सर्दी खोकला ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन व औषध उपचारा घेऊन घरी आराम करावा."

- डॉ. सुशील पवार, एमडी, डीजीओ

Climate Change Health
Climate Change : एकाच दिवसात 3 ऋतूंची अनुभूती; निसर्गातील बदलांचा सर्वच घटकांना फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.