Nashik Crime News : रामतीर्थावर दुचाकी चोरीचे वाढते प्रमाण! गस्त वाढविण्याची मागणी

bike theft latest marathi news
bike theft latest marathi newsesakal

पंचवटी (जि. नाशिक) : पवित्र तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामतीर्थावर विविध धार्मिक श्राध्द विधीसाठी येणाऱ्यांची कायम गर्दी असते. विविध राज्यातून तसेच स्थानिक भाविकांची वर्दळ असलेल्या रामतीर्थ परिसरात अनेक वाहने पार्क केली जातात. भोवतालचा परिसर वाहनांच्या पार्किंगने भरलेला असतो.

या परिसरात पार्क केलेल्या दुचाकी चोरट्यांकडून गायब करण्याचे प्रकार गेल्या तीन- चार महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुचाकी चोरीस गेलेल्यांचे नुकसान होत असल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप होत आहे. (Increasing number of two wheeler thefts on Ramtirtha Demand for increased patrolling Nashik Crime News)

रामतीर्थाच्या परिसरातील गर्दीचा फायदा घेऊन येणाऱ्या भाविकांचे पैसे, कपडे, मौल्यवान वस्तू आदींच्या चोऱ्यांचे प्रकार वारंवार घडतात. त्यात आता दुचाकी चोऱ्यांचे वाढलेले प्रमाणाने या परिसरात दुचाकीस्वारांची धास्ती वाढली आहे.

सकाळच्या वेळी दशक्रिया विधीसाठी होणाऱ्या गर्दीच्या वेळेचा फायदा चोरटे घेत असून, त्यावेळीच दुचाकींची चोरी होत आहे. त्याच प्रमाणे सोमवारी कपालेश्वरच्या पालखी आणि मंदिरात दर्शन घेण्यात येणाऱ्यांची गर्दी होत त्यावेळीही दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार घडतात.

दुचाकी चोरीस गेल्यानंतर त्याची तक्रार करण्यासाठी जेव्हा दुचाकीस्वार पोलिस ठाण्यात जातात. तेव्हा त्यांना तीन- चार दिवस दुचाकीचा शोध घ्या असा सल्ला दिला जातो. भाविकांच्या अनेक दुचाकी चोरीस गेल्याने येथे वाहन घेऊन येताना दुचाकीस्वार विचार करू लागले आहेत.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

bike theft latest marathi news
Dhule Crime News : रस्तालूट, घरफोडीतील दोघे अटकेत; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

स्थानिकांच्या दुचाकी चोरीस गेल्याचे प्रकार घडल्यानंतरही हा प्रकार पोलिस फारशा गांभिर्याने घेत नसल्याचे दिसते. रामतिर्थाच्या परिसर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असले तरी ते अजूनही सुरु करण्यात आलेले नाहीत. त्याचा फायदा चोरटे घेत आहेत.

त्यामुळे दुचाकी चोरीचा शोध घेणे मुश्कील होत आहे. रामतीर्थाच्या सुरक्षेसाठी कपालेश्वर पोलिस चौकी उभारण्यात आलेली आहे.

मात्र, ही पोलिस चौकी कधीतरीच उघडी दिसते. तिच्या दरवाजावर बऱ्याचदा कुलूपाचे दर्शन होते. भाविकांना काही तक्रार करण्याची वेळ आली तर त्यांना थेट पंचवटी पोलिस ठाण्यात जाण्याची वेळ येते. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना ही बाब त्रासदायक ठरते.

bike theft latest marathi news
Unique Tradition : वडांगळीकरांची जावयासाठीची जगावेगळी प्रथा! जाणुन घ्या नक्की भानगड काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com