

- सहभागासाठी युवकांना ऑनलाइन-ऑफलाइन नोंदणीचा पर्याय
- महोत्सवात सेलिब्रिटी, प्रशासकीय अधिकारी राहणार उपस्थित
YIN Art Festival : ‘सकाळ माध्यम समूहा’चे ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन)तर्फे आयोजित यिन कला महोत्सव उपक्रम राज्यभरात होत आहे.
प्रथमच महाविद्यालयीन तरुणाईला आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळाल्याने मोठ्या प्रमाणात युवा कलावंत महोत्सवात सहभागी होत आहेत.
उत्तर महाराष्ट्र स्तरावर होत असलेल्या नाशिक विभागीय यिन कला महोत्सवाचा काउंटडाउन सुरू झाला असून, महाविद्यालयीन युवकांचा प्रतिसाद वाढतो आहे.
युवा कलावंतांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. महोत्सवात सेलिब्रिटींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. (Increasing response to Nashik Regional Yin Art Festival Scan this QR code to participate nashik)
महाविद्यालयीन तरुणाईच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून यिन व्यासपीठातर्फे राज्यभरातील तरुणाईला एकाच व्यासपीठावर तब्बल १९ स्पर्धांच्या माध्यमातून कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
यशस्वी युवा कलावंतांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच, एकूण कामगिरीच्या आधारे विभागीय स्तरावरील पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
आपल्यातील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत अधिकाधिक महाविद्यालयीन युवा कलावंतांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन असे नोंदणीचे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले.
सहभागी होण्यासाठी अशी करा नोंदणी
१) Young Inspirators Network या नावाचे App Google Play Store वरून डाउनलोड करा. किंवा दिलेला QR Code स्कॅन करावा. ॲप डाउनलोड केल्यावर खालील प्रक्रियेनुसार आपली नोंदणी करा.
२) App डाउनलोड केलेले असल्यास Play Store वरून अपडेट करावे.
३) आपल्याला ज्या विभागाच्या स्पर्धेत सहभाग नोंदवायचा आहे, त्या विभागावर जाऊन क्लिक करा.
४) यानंतर आपल्या आवडत्या स्पर्धेचे नाव निवडा.
५) आपला आधारकार्ड नंबर अचूक टाकावा, तसेच आधारकार्ड आणि कॉलेज आयकार्ड/ बोनाफाईड फोटो अपलोड करावा.
६) आपल्या आवडत्या स्पर्धेचे शुल्क ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन भरावे.
७) आपण स्पर्धेत सहभागी झाल्याची पावती मेलवर किंवा SMS द्वारे मिळेल.
८) स्पर्धेबद्दलची पुढील माहिती आपल्याला App वर किंवा SMS द्वारे मिळेल.
ऑफलाइन नोंदणीचा पर्याय उपलब्ध
विद्यार्थ्यांना ऑफलाइन स्वरूपात नोंदणी करीत या महोत्सवातील स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यासाठी ‘यिन’चे नाशिक विभागीय अधिकारी गणेश जगदाळे यांच्याशी ९०७५०१७५०८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
या कला प्रकारांमध्ये होता येणार सहभागी
१) नृत्य (सोलो), २) नृत्य (ग्रुप), ३) एकपात्री अभिनय, ४) काव्यवाचन, ५) एकल गायन (सोलो सिंगिंग) ६) स्टँडअप कॉमेडी/मिमिक्री, ७) फॅशन शो, ८) फोटोग्राफी, ९) वक्तृत्व, १०) वादविवाद (डिबेट), ११) मूक अभिनय (माइम ॲक्ट ग्रुप), १२) स्किट कॉम्पिटिशन, १३) रॅप, १४) क्ले वर्क, १५) कोलाज वर्क, १६) व्यंगचित्र, १७) रांगोळी, १८) मेंदी, १९) चित्रकला.
कधी व कुठे होणार स्पर्धा
तारीख : २० व २१ ऑक्टोबर २०२३,
वेळ : सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत
ठिकाण : कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशि
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.