Latest Crime News | 3 वर्षाच्या बालिकेसोबत अश्लील चाळे; संशयित आरोपीचा मारहाणीने मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime News

3 वर्षाच्या बालिकेसोबत अश्लील चाळे; संशयित आरोपीचा मारहाणीने मृत्यू

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील म्हैस खडक येथे तीन वर्षीयअल्पवयीन बालिके सोबत अश्लील चाळे करणा-या संशयित आरोपीचा बलसाड येथे उपचारा दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दरम्यान मयत आरोपीवर पोक्सो(बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदान्वये) अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हैसखडक येथे तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये या करीता अतिरिक्त पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची माहिती कळवण चे पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांनी दिली. (Indecent assault with 3 year old girl Suspect accused beaten to death Nashik Latest Crime News)

या बाबत पोलीस सूत्रांकडून माहिती नुसार २१/८/२०२२ रोजी म्हैसखडक येथील रहात्या घरी तीन वर्षाची बालिका अंगणात खेळत असतांना संशयित आरोपी वसंत सयाजी ठाकरे वय ४५ याने सदर बालिकेला उचलून आपल्या घरी नेले व तिच्याशी अश्लील चाळे करीत विनयभंग केला.

याबाबत पिडीतेच्या आईने गुन्हा दाखल केला आहे.अत्याचाराची बाब पिडीतेची आई हिच्या लक्षात आल्याने आरोपीस विचारणा केली असता त्याचा राग आरोपीस आला दरम्यानच्या दोन दिवसात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरुच होते. दिनांक २४/८/२०२२ रोजी आरोपी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेतात जात असतांना पिडीतेच्या आई, वडीलांनी अंगावर लाकडी मुसळाने मारहाण केली. या मारहाणीत आरोपी गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सुरगाणा ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले होते.

पुढील उपचारार्थ नातेवाईकांनी धरमपूर येथे दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी बलसाड येथील जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान २६/८/२०२२ रोजी आरोपीचा रुग्णालयातच मृत्यू झाला. या मारहाणीची घटना समजताच पोलिसांनी म्हैस खडक येथे घटनास्थळी धाव घेत अधिक माहिती जाणून घेतली. याबाबत विठ्ठल सयाजी ठाकरे यांनी बालिकेच्या आई वडिलांविरोधात मारहाणीमुळे वसंतचा मृत्यू झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.

या घटनेची पोलीस उपविभागीय अधिकारी गायकवाड यांनी गंभीर दखल घेत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार संशयित मयत वसंत विरोधात व संशयित मयतास झालेली मारहाण असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके, सागर नांद्रे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी अभोणा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, बा-हे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल वाघ, पेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे हे अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. दरम्यान बलसाड पोलिस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.