बाप्पाच्या स्वागतासाठी दीड लाख चाकरमानी लालपरीतून होणार कोकणकडे रवाना!

यंदा बाप्पाच्या स्वागतासाठी सुमारे १.५० लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होणार
bus
bus esakal

मुंबई: गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी दिलेल्या उत्स्फर्त प्रतिसादामुळे ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या हाऊस फुल झाल्या आहेत. यापैकी १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिेंगचे प्राधान्य मिळाले आहे. त्यामुळे यंदा बाप्पाच्या स्वागतासाठी सुमारे १.५० लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

गणेशोत्सव हा कोकणातील महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो. गणपती व कोकणातील चाकरमान्यांचे एक अतुट नाते बनले आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर यंदा मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणकडे रवाना होत आहेत. गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांचे नियोजन करते. यंदा महामंडळाने गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे येथून २ हजार ५०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना सुरुवात झाली आहे. चाकरमान्यांनी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या जादा गाड्यांना पसंती दिल्याने ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत तब्बल ३ हजार ४१४ गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. या गाड्यांमधून सुमारे १.५० लाखांहून अधिक चाकरमानी प्रवास करणार आहेत.

कोकणातील चाकरमान्यांचे आणि एसटीचे ऋणाणूबंध कायम आहेत. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या लालपरीला सुरक्षित प्रवास म्हणून प्राधान्य दिल्याने चाकरमान्यांचे मनापासून आभार.

-शेखर चन्ने,उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

फिरती गस्ती पथके तैनात

गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा वाहतूकीची सेवा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महामंडळाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फिरती गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व सुरक्षित-सुरळीत वाहतूकीसाठी गस्ती पथके विशेष दक्षता घेणार आहेत. याशिवाय कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरूस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत.

- एसटीच्या ३ हजार ४०० गाड्यांचे आरक्षण फुल;

- १९०० गाड्यांना ग्रुप बुकिंगचे प्राधान्य

-१.५० लाख चाकरमानी एसटीतून करणार प्रवास

- प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फिरती गस्ती पथके तैनात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com