Independence Day 2023: प्रथमतः भारतीय, अंतिमतः भारतीय! शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्साहात ध्वजारोहण

Enthusiastic response to the event organized at Maratha High School.
Enthusiastic response to the event organized at Maratha High School.esakal

Independence Day 2023 : स्‍वातंत्र्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्‍थांमध्ये मंगळवारी (ता. १५) ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्‍स्‍फूर्त सहभाग नोंदविला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात झालेल्‍या कार्यक्रमात प्रभारी कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. (Independence Day 2023 Indian First lastly Enthusiastic flag hoisting in schools colleges nashik)

मराठा हायस्कूल

गंगापूर रोडवरील मविप्र संस्‍थेच्‍या मराठा हायस्‍कूलमध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ॲड. लक्ष्मण लांडगे, सदस्य गुलाबराव भामरे, सुनील निरगुडे, एकनाथ भुसारे, स्वाती चव्हाण, राजेश भामरे, राहुल पवार, अशोक जाधव, जगन्नाथ तिदमे, बाजीराव ठाकरे, प्रमोद पाटील, सुनील पाटील, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष योगेश शेळके, माता- पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा स्मिता सोनवणे, मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे, पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे, भगवंत पवार, सतीश ठाकरे उपस्थित होते.

संगीत शिक्षक दिनकर दांडेकर यांच्या गीतमंचाने सादरीकरण केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका मंगला शिंदे यांनी केले.

आयसीएआय नाशिक शाखा

इन्‍स्‍टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया (आयसीएआय) नाशिक शाखेत झालेल्‍या कार्यक्रमास अध्यक्ष राकेश परदेशी, उपाध्यक्ष संजीवन तांबूळवाडीकर, सचिव जितेंद्र फाफट, खजिनदार अभिजित मोदी, विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष मनोज तांबे, विशाल वाणी, सोहिल शाह, पियुष चांडक उपस्‍थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Enthusiastic response to the event organized at Maratha High School.
Independence Day : पोलीस उप निरीक्षक संजय माळी यांना मिळाले राष्ट्रपती पदक, गुन्हे शाखेतील कामगिरीची दखल

पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालय

पुष्पावती रुंगटा कन्‍या विद्यालयातील विद्यार्थिनींनी अटल टिंकरिंग लॅबमध्ये प्रकल्पांचे सादरीकरण केले. कर्नल (निवृत्त) अनिल बेदरकर यांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्‍या उपक्रमाचे कौतुक केले.

विद्यार्थिनींनी ‘ऑटोमॅटिक रोबोट फ्लॅग’ प्रकल्प सादर केला. संस्थेचे सचिव अश्विनीकुमार येवला, मुख्याध्यापिका ज्योत्स्ना आव्हाड, रुंगटा विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक जाधव, शालेय समिती अध्यक्ष विलास पूरकर, मिलिंद कचोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य पाळकर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मनोज शिंपी, ज्योती कांबळे आदींनी प्रकल्पांची पाहणी केली.

मविप्र संस्‍था

मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍थेतर्फे केटीएचएम महाविद्यालय प्रांगणात झालेल्‍या कार्यक्रमास सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

शिक्षणाधिकारी डॉ. विलास देशमुख, डॉ. नितीन जाधव, डॉ. अजित मोरे, प्रा. बी. डी. पाटील, प्रा. दौलत जाधव, संचालक डॉ. प्रशांत सूर्यवंशी, डॉ. आर. डी. दरेकर, डॉ. दिलीप डेर्ले, प्रा. मुंजा नरवडे, कल्पना वारुंगसे, मीनाक्षी गायधनी, डॉ. बाळासाहेब गुंजाळ उपस्थित होते.

मराठा हायस्कूल व अभिनव शाळेतील धैर्या धात्रक, साईराज शेळके, संचित पगार, हेतल लीलके यांचा वाढदिवसानिमित्त सत्‍कार केला. सूत्रसंचालन संजय होळकर यांनी केले.

Enthusiastic response to the event organized at Maratha High School.
Independence Day 2023 : टिळकांच्या अगोदर 'केसरी वाडा' कुणाकडे होता ?

केटीएचएम महाविद्यालय

केटीएचएम महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्‍यांनी एनसीसी छात्रांना शपथ दिली. परेडचे नेतृत्व अंडर ऑफिसर शीतल जाधव हिने केले.

क्रीडा विभागप्रमुख प्रा. सोपान जाधव, कॅप्टन डॉ. योगेश गांगुर्डे, कॅप्टन शैला मेंगाणे उपस्थित होते. अक्षदा चव्हाणने शिवगर्जना सादर केली. सूत्रसंचालन डॉ. तुषार पाटील यांनी केले.

सोपान योग महाविद्यालय

सिडकोतील धम्मगिरी सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था संचलित सोपान योग महाविद्यालयातील कार्यक्रमात अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

निवृत्त प्राचार्य एन. के. देवरे, योगाचार्य व महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे पहिले संमेलनाध्यक्ष अशोक पाटील, प्रा. राज सिन्नरकर, संस्थेचे संचालक राजेंद्र काळे, संस्था सचिव डॉ. पल्लवी जाधव, संस्थेचे मार्गदर्शक डॉ. विशाल जाधव, एल. डी. कोळंबे, प्रफुल्ल जोशी, प्रा. शेलार, आकाश चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष कैलास जाधव, अॅड. शरद जाधव, हर्षल पाटील उपस्‍थित होते. सूत्रसंचालन प्राचार्य यू. के. अहिरे यांनी केले.

Enthusiastic response to the event organized at Maratha High School.
Independence Day 2023: खरं की काय! भारतातल्या या किल्ल्यावरून दिसतो अख्खा पाकिस्तान देश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com