देशात यंदा ३ हजार १६० लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 food Grain production

देशात यंदा ३ हजार १६० लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज

नाशिक : देशात यंदा दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार अन्नधान्याचे तीन हजार १६० लाख, तर कडधान्यांचे २६९.५, तेलबियांचे ३७१.५ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. नवी दिल्लीतील खरीप अभियानासाठीच्या राष्ट्रीय कृषी संमेलनाचे उदघाटन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांच्या हस्ते झाले. संमेलनात २०२२-२३ साठी तीन हजार २८० लाख टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले.

हेही वाचा: नाशिक : शेवगा लागवड योजनेतंर्गत प्रतिहेक्टरी ३० हजार अनुदान

डाळी आणि तेलबियांचे यंदा उत्पादन अनुक्रमे २६९.५ आणि ३७१.५ लाख टन असेल. तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार २०२०-२१ मध्ये फलोत्पादनाचे तीन हजार ३१० लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी कीटकनाशके आणि बियाणांची उपलब्धता निश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार (Central and State Governments) एकत्र काम करतील, असे श्री. तोमर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की युरियाच्या जागी नॅनो-युरिया वापरावा. सरकार नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीवर यापुढे भर देत राहील.

हेही वाचा: सोलापूर : लागवड खर्च कमी व उत्पादन अधिक

Web Title: India Country Is Estimated To Produce 3 Thousand 160 Lakh Tonnes Of Foodgrains This Year Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top