Agriculture News : सरकारी अस्थिरतेचा फटका; भारताचा कांदा निर्यातीच्या शर्यतीत पिछाडीवर
India’s Onion Exports Hit by Unstable Policies : नाशिक जिल्ह्यातील बाजारात विक्रीसाठी आणलेला कांद्याचा ढिग. केंद्र सरकारच्या अस्थिर निर्यात धोरणामुळे भारतीय कांद्याची जागतिक बाजारपेठेत मागणी घटली आहे.
नाशिक- कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणाचा निर्यातीवर विपरीत परिणाम होत आहे. जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान आणि चीनच्या कांद्याला जास्त प्रमाणात मागणी असल्याचे हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्स्पोर्ट असोसिएशनने म्हटले आहे.