Snake Rescue Operation by Local Expert : लासलगावजवळील डोंगरगाव येथे बुटात सापडलेल्या इंडियन स्पेक्टिकल कोब्राला सर्पमित्र असिफ पटेल यांनी सुरक्षित पकडले. पावसाळ्यात सापांचा वावर वाढत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
लासलगाव: विंचूर परिसरातील डोंगरगाव येथे तरळी माथा परिसरात परशुराम गुज्जर यांच्या राहत्या घराच्या ओसरीत ठेवलेल्या बुटात तब्बल दोन ते तीन फूट लांबीचा विषारी इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आढळून आला.