Nashik: गुणवत्ता होतेय सुमार शिक्षणाचा प्रभारींवर भार! शाळा महाविद्यालय, विद्यापीठस्‍तरावर नियुक्तीबाबत उदासीनता

colleges
collegessakal

Nashik News: अगदी शालेयस्‍तरापासून महाविद्यालय, विद्यापीठस्‍तरापर्यंत शिक्षणाच्‍या गुणवत्तेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शासन, प्रशासनाच्‍या उदासीन धोरणामुळे वेगवेगळ्या स्‍तरावर महत्त्वाच्‍या पदांवर प्रभारींना जबाबदारी दिल्‍याचे ‘सकाळ’ने केलेल्‍या सखोल तपासणीतून समोर येत आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना अपुरे मनुष्यबळाचे मोठे आव्‍हान राहणार असून, त्‍यावर आत्तापासूनच उपाययोजना करण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त केली जात आहे. सद्यःस्‍थितीत सर्व शासकीय आस्‍थापनांमध्ये मनुष्यबळाची चणचण जाणवत आहे. (Indifference regarding recruitment at school college university level nashik news)

परंतु महत्त्वाच्‍या विभागांमध्ये अपुरे मनुष्यबळ ठेवणे गुणवत्तेच्‍या दृष्टीने धोकादायक मानले जात आहे. भावी पिढी घडविण्याची जबाबदारी असलेल्‍या शिक्षण विभागातही सध्या मनुष्यबळाचे मोठे आव्‍हान आहे.

शिक्षक, प्राध्यापकांची अपुरी संख्या अध्ययन प्रक्रियेवर प्रभाव टाकत आहे. परंतु शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्‍या प्रशासकीय पदांवर प्रभारींची जबाबदारी असल्‍याने धोरणात्‍मक बाबींमध्ये मर्यादा येत असल्‍याचे तपासणीतून समोर येत आहे. वेगवेगळ्या स्‍तरावरील या आव्‍हानाला एकत्रितरीत्‍या पाहण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होत आहे.

शिक्षण मंडळावर वर्षानुवर्षे प्रभारी

दहावी, बारावीच्‍या परीक्षांची जबाबदारी असलेल्‍या विभागीय शिक्षण मंडळातील अध्यक्ष, सचिवपदाची जबाबदारी वर्षानुवर्षे प्रभारींकडे असल्‍याचे समोर येते आहे. सद्यःस्‍थितीत सहाय्यक सचिव मच्‍छिंद्र कदम यांच्‍याकडे सचिवपदाचा, तर शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्‍हाण यांच्‍याकडे विभागीय अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार आहे. यापूर्वीही नितीन उपासनी यांच्‍याकडे मुंबईची जबाबदारी असतानाही नाशिक विभागीय अध्यक्षपदाचा अतिरिक्‍त कारभार होता. परीक्षा प्रक्रियेवर यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे.

colleges
Nashik News: विद्यादान करू का, नवमतदार नोंदवू! जिल्ह्यातील शिक्षक विवंचनेत

शिक्षण विभागाचा ‘खेळ मांडला...’

जिल्‍हा परिषदेचा शिक्षण विभागदेखील नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला आहे. कधी भ्रष्टाचार, तर कधी वादविवादामुळे कारभारावर परिणाम होत आहे. सध्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी उदय देवरेंकडे दिलेली असताना, तत्‍पूर्वी नियुक्‍त व चौकशीच्‍या फेऱ्यात अडकलेले प्रवीण पाटीलही शिक्षाधिकाऱ्यांच्या दालनात उपस्थित राहात आहेत. शिक्षण विभागाचा खेळ मनोरंजनाचा विषय ठरत आहे.

‘मुक्‍त’ला कुलसचिव कधी?

राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठात प्रा. संजीव सोनवणे यांच्‍या नियुक्‍तीपूर्वी कुलगुरूपदाचा प्रभारी कार्यभार महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पाटील यांच्‍याकडे होता. बऱ्याच दिवसांपासून रिक्‍त असलेल्‍या प्र-कुलगुरूपदी प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांची नोव्‍हेंबरमध्ये नियुक्‍ती जाहीर केली होती.

परंतु प्रदीर्घ कालावधीपासून रिक्‍त असलेल्‍या कुलसचिव या महत्त्वाच्‍या पदावर उमेदवार निवडीची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. छाननी प्रक्रिया पूर्ण झालेली असून, लवकरच मुलाखतींची प्रक्रिया राबविली जाणार असल्‍याचे ‘सकाळ’ने केलेल्‍या चौकशीनंतर सांगण्यात आले.

colleges
Nashik News: जिल्ह्यात 27 गावांतील पाण्याचे नमुने दूषित; सिन्नर तालुक्यात सर्वाधिक दूषित पाणी

पुणे विद्यापीठात प्रभारींचेच राज्‍य

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्राच्‍या समन्‍वयकपदाची जबाबदारीही सध्या प्रभारींवर आहे. उपकेंद्रासाठी सहाय्यक कुलसचिव निवडीची प्रक्रिया सुरू असून, अद्याप अंतिम निवड झालेली नाही.

विद्यापीठाशी संलग्‍न महाविद्यालयांमध्ये प्राचार्यही प्रभारीच आहेत. विद्यापीठाच्‍या एक हजार ६६ महाविद्यालयांपैकी ५१३ मध्ये प्रभारी प्राचार्य असून, १९ महाविद्यालयांमध्ये प्राचार्यपदाच्‍या जागा रिक्‍त आहेत. त्‍यामुळे पुणे विद्यापीठातही प्रभारींचेच राज्‍य असल्‍याचे समोर येत आहे.

‘डीटीई’ सहसंचालकांच्‍या नियुक्‍तीचा विसर

तंत्रशिक्षण संचालनालयाच्‍या विभागीय स्‍तरावर मुंबई, पुणे वगळता इतर सर्वत्र सहसंचालक प्रभारी आहेत. अनेक वर्षांपासून नाशिकमध्येही शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य हेच प्रभारी सहसंचालक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. संलग्‍न महाविद्यालयांची संख्या वाढत असताना, पूर्णवेळ सहसंचालक नियुक्‍तीची आवश्‍यकता व्‍यक्‍त होत आहे.

colleges
Nashik News: शैक्षणिक साहित्याचे पैसे डीबीटीद्वारे; शासनाचा आदिवासी विकास विभागाला दणका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com