Indigo Airlines
sakal
नाशिक
Rohit Ugavkar : 'देशातील मंत्र्यांना काळजी आहे की नाही?' बालीतून नाशिकचे रोहित उगावकर यांचा मदतीसाठी आर्त व्हिडिओ व्हायरल
Over 160 Indian Tourists Stranded in Bali Due to IndiGo Glitches : देश-विदेशातील प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. अशात बाली येथे अडकलेल्या नाशिकसह राज्य व देशातील पर्यटकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नाशिक: इंडिगो एअरलाइन्समुळे देश-विदेशातील प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. अशात बाली येथे अडकलेल्या नाशिकसह राज्य व देशातील पर्यटकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये देशातील मंत्र्यांनी परिस्थितीकडे लक्ष घालत अडकलेल्या पर्यटकांसाठी उपाययोजना करण्याची आर्त हाक प्रवाशांकडून नाशिकचे रोहित उगावकर देताना दिसत आहेत.
