इंदिरानग- मंगळवारी (ता. ४) दुपारी चारला इंदिरानगरच्या साईनाथनगर चौफुलीवर असलेल्या डी. एम. फर्निचरच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत या कारखान्यासह शेजारी असलेले गॅरेज खाक झाले; तर दुसऱ्या गॅरेजचे मोठे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या दहा बंब आणि ४० जवानांनी ४० मिनिटांत या आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. दोन भावांमध्ये दुकानाच्या मालकीवरून वाद झाल्याने दुकानाला आग लावल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी वसीम अख्तर यांनी केला आहे.