Crime
sakal
इंदिरानगर: वडाळा गावच्या शंभर फुटी रस्त्यावरील गॅस गुदामाचा सुनसान परिसर एका अत्यंत संवेदनशील घटनेचा साक्षीदार ठरला. या धोकादायक मानल्या जाणाऱ्या भागात अंगावर सुमारे आठ ते दहा तोळे सोन्याचे दागिने घातलेल्या अंदाजे ८० वर्षांच्या सुरभी कुमार नामक आजीबाई रडत होत्या. या रस्त्यावर वावरणाऱ्या लुटारूंचा इतिहास पाहता, परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी समन्वय साधत आजींना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचविले.