इंदिरानगर: ऐन गणेशोत्सवात मुंबई नाका ते पाथर्डी फाटा भागात उड्डाणपुलावर सुरू असलेली रस्त्याची कामे, पावसामुळे रस्त्यांची झालेली चाळण यामुळे या दरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पहावयास मिळत आहे. सोमवारी (ता.२५) सायंकाळी लेखानगर भागात उड्डाणपुलाखाली व पाथर्डी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सण, उत्सवादरम्यान ही वाहतूक कोंडी टाळण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर असेल.