Nashik News : सुरक्षिततेचे तीन तेरा! वीज कर्मचाऱ्यांच्या अपघाताने गंभीर प्रश्न निर्माण
Lineman injured by electric shock at Damodar Chowk : नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील दामोदर चौकात विजेच्या खांबावर काम करत असताना विजेचा धक्का बसून जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
इंदिरानगर- रविवारी (ता. २०) सकाळी साडेनऊच्या सुमारास पाथर्डी फाटा येथील दामोदर चौकात विजेच्या खांबावर काम करत असताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने कर्मचारी राकेश शेवाळे खाली पडले. त्यांच्या उजव्या हाताला आणि डोक्याला मार लागला आहे.