Police
sakal
इंदिरानगर: वेळ सायंकाळी सहा, ठिकाण : पाथर्डी गाव चौफुली जवळ. येथे नव्याने वसलेला मच्छी बाजार, अंधार पडू लागल्याने जोतो आपापल्या घराकडे जाण्याच्या गडबडीत असताना इंदिरानगर पोलिस ठाण्याचे बीट मार्शल रमेश कोरे यांना एक चिमुरडी रडताना दिसली. ते तिच्या जवळ गेले त्यांनी विचारपूस सुरू करतात ती आई आणि वडील सापडत नसल्याने रडू लागली आणि कोरे यांना ही बालिका हरवल्याचे लक्षात आले.