इंदिरानगर: इंदिरानगरच्या प्रभाग क्रमांक ३० मधील कलानगर येथे जलवाहिनी टाकण्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. येत्या काही दिवसांत जलकुंभ कार्यान्वित होऊन अनेक वर्ष पाणीटंचाईने होरपळणाऱ्या येथील सुमारे ३० हजार नागरिकांना दिलासा मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.