इंदिरानगर: शाळकरी मुली, युवती आणि महिलांची छेड काढणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवू, तुम्ही फक्त न घाबरता तत्काळ पोलिसांना ११२ क्रमांकावर ही माहिती द्या, असे आवाहन इंदिरानगरच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी महिलांना केले. महिन्यापासून रस्त्याने एकट्या-दुकट्या चालणाऱ्या महिलांसोबत घडणाऱ्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी (ता. ७) सायंकाळी रथचक्र चौकातील विठ्ठल मंदिर सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत प्रतिष्ठानच्या संस्थापिका संध्या कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.