
Nashik Indrayani Rice: भाताचे आगर म्हणून इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. दरवर्षी येथे भाताचे नवनवीन वाण घेण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील तांदूळ उत्पादन इतर राज्यांच्या तुलनेत उत्कृष्ट प्रतीचे आहे, त्यात इगतपुरी तालुक्यातील तांदळाने आपला नावलौकिक संपूर्ण देशात झाला.
तांदूळ उत्पादकता व अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमुळे परदेशातही मागणी सतत वाढत आहे. केंद्राने बासमती व गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर काही प्रमाणात निर्बंध घातले असले, तरी गुणवत्ता व मागणीमुळे त्याचा स्थानिक भात इंडस्ट्रीवर फारसा परिणाम झालेला नाही. उलट, इंद्रायणी भाताने भावाचा उच्चांक गाठला असून, हमी भावापेक्षा जादा दराने खरेदी होत आहे. (Indrayani rice of Igatpuri fetches highest price nashik news)
इगतपुरी तालुक्यात उत्पादित होणारा इंद्रायणी, एक हजार आठ, एमपी १२५, वाडा कोलम, जय श्रीराम, जिरा राईस, लवली राईस या वाणांचे उत्पादन इतर राज्यांच्या तुलनेत अल्प प्रमाणात असल्याने त्याचा पुरवठा व मागणी महाराष्ट्रातच आहे. अर्थातच, तांदूळ निर्यातीवर नाशिक जिल्ह्यातील राईस इंडस्ट्रीजवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे.
भारतातून जगभरात मोठ्या प्रमाणात बासमती व गैरबासमती तांदळाची निर्यात होत असते. त्यात पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश व हरियाना राज्यांतून विविध जातींच्या तांदळाची मोठी निर्यात होत असते. महाराष्ट्रातून काही ठिकाणांहून सिल्की परमल या वाणाची निर्यात होते; परंतु त्याचे प्रमाण फार अल्प आहे.
इंद्रायणीला मागणी वाढली
इगतपुरी तालुक्यात उच्च प्रतीच्या इंद्रायणी तांदळाचे उत्पन्न सर्वाधिक होते. यंदा तर त्यात आणखी भर पडली आहे. इंद्रायणी जातीच्या भाताने उच्चांकी आकडा गाठला असून, प्रतिक्विंटल तीन हजार २०० रुपये एवढा भाव मिळत आहे. एक हजार आठ भाताला दोन हजार ८००, एमपी १२५ भाताला दोन हजार ७००, वाडा कोलमला दोन हजार ७००, तर जय श्रीराम वाणाला दोन हजार ८०० रुपये खरेदीचा भाव मिळाला आहे.
महाराष्ट्रात इतर ठिकाणांतून इंद्रायणीची मागणी वाढल्याने उच्चांकी भाव मिळाल्याचे निदर्शनास येत आहे. कच्च्या मालाला समाधानकारक भाव मिळत असल्याने आगामी काळात तांदळाच्या भावात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता राईस उद्योग क्षेत्रात वर्तविली जात आहे.
कमी उत्पादनातच वाढतो भाव
यंदाच्या हंगामात तालुक्यात पावसाचा अतिरेक व वातावरणातील बदलाने भाताच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. काही भागात तर हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला. असे असले, तरी यंदा मागणी वाढत असल्याने शेतकऱ्यांकडील मालाला अपेक्षेप्रमाणे भाव मिळत आहे. केंद्र सरकारने निर्देशित केलेल्या कच्च्या भाताच्या खरेदीवर हमी भावापेक्षा ७०० ते एक हजार रुपयांनी यावर्षी वाढीव भाव शेतकऱ्यांना मिळतो. दरवर्षीच्या तुलनेत पाहता यावर्षी मालाचा दर्जा व उत्तम भाव मिळत असल्याने भात खरेदी- विक्रीत व्यावसायिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
"इगतपुरी तालुक्यातील भात उत्तम प्रतीचा असल्याने महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. येथील तांदळाची इतर देशांत निर्यात होत नसल्याने तालुक्यातील राईस इंडस्ट्रीजवर कुठलाही परिणाम होणार नाही. यावर्षी भाताचे उत्तम प्रतीचे उत्पादन झाल्याने मागणी वाढत असून, इंद्रायणीने उच्चांक गाठला आहे." - संजय चोरडिया, तालुकाध्यक्ष, राईस अॅन्ड भगर मिल असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.