
नाशिक/तळवाडे दिगर : कोरोनाबाधितांची संख्या आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरवात झाली असून, बागलाण तालुक्यातील सटाण्यासह ३२ गावांत कोरोनाने शिरकाव केला आहे. २ मेस तालुक्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर आजपर्यंत तालुक्यात २६५ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील १५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
काळजी घेऊन मानसिक आधार
जायखेडा, ठेंगोडा, नामपूर येथील प्रत्येकी दोन, तर सटाणा, मुल्हेर, तांदळवाडी, ताहाराबाद, मळगाव, वटार येथील प्रत्येकी एक अशा तालुक्यातील १२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील बाधित रुग्णांवर अजमीर सौंदाणे येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून, तेथे आरोग्य विभागाची टीम रुग्णांची पुरेपूर काळजी घेऊन मानसिक आधारही देत आहे. गेल्या साडेचार महिन्यांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे.
रुग्ण आढळलेली गावे
सटाणा, जायखेडा, वाडीपिसोळ, जयपूर, सोमपूर, ठेंगोडा, आराई, मुल्हेर, तांदळवाडी, नामपूर, ब्राह्मणपाडे, पिंपळकोठे, निताणे, नांदीन, राजापूर, ताहाराबाद, रावेर, लखमापूर, मुंजवाड, मळगाव, नवे निरपूर, चौगाव, मोरेनगर, डांगसौंदाणे, वीरगाव, लाडूद, वटार, अंतापूर, काकडगाव, ब्राह्मणगाव, धांद्री, भाक्षी (फुलेनगर).
तालुक्यावरील दृष्टिक्षेप
शहर व तालुक्यातील कंटेन्मेंट झोन : ४६
सर्वेक्षणासाठीचे कर्मचारी : ३३४
सर्वेक्षण केलेली घरे : ९,०६७
तपासलेले नागरिक : ४७,९९४
घेतलेले एकूण स्वॅब : ९६९
एकूण निगेटिव्ह : ७०४
एकूण बाधित पुरुष : १५३
एकूण बाधित महिला : १००
एकूण बाधित बालके : ७
एकूण बाधित बालिका : ५
महिनानिहाय वाढलेली रुग्णसंख्या
मे महिन्यातील बाधितांची संख्या : ९
जून महिन्यातील बाधितांची संख्या : ७०
जुलै महिन्यातील बाधितांची संख्या : ९०
ऑगस्ट महिन्यातील बाधितांची संख्या : ९६
माहिती लपवू नये
बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांना गावाबाहेर १४ दिवस क्वारंटाइन करावे, तसेच आपल्या गावात कोणी शेजारी बाधित आढळल्यास शेजारी किंवा संपर्कातील नागरिकांनी कोणतीही माहिती लपवू नये. स्वत:हून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन बागलाणचे तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव यांनी केले आहे.
संपादन : भीमराव चव्हाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.